February 8, 2026

बोधीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील आधुनिक धम्मसेनानी:भंते उर्गेन संघरक्षित – धम्मचारी जिनोदय

  • लातूर – त्रिरत्न बौद्ध महासंघ, लातूर तर्फे भंते उर्गेन संघरक्षित यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.या प्रसंगी धम्मचारी जिनोदय यांनी प्रभावी व ओघवत्या भाषेत धम्मप्रवचन दिले.
    आपल्या प्रवचनात त्यांनी सांगितले की, बोधीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५० च्या लेखामध्ये जागतिक ग्रंथ,जागतिक संघटन आणि नवा धम्मसेवक या तीन महत्त्वपूर्ण गोष्टींची अपेक्षा व्यक्त केली होती. त्या संकल्पना साकार करताना भंते उर्गेन संघरक्षित यांनी डॉ.बाबासाहेबांच्या तीन भेटी घेतल्या आणि बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास केला.चिंतन व मनन करून त्यांनी आयुष्यभर धम्मप्रचार व प्रसाराचे कार्य अखंडितपणे केले.

  • भंते उर्गेन संघरक्षित यांनी विविध बौद्ध स्थळांना भेट दिल्या,अनेक देशांतील परंपरेचा अभ्यास केला. आधुनिक धम्मसेवक कसा असावा यासाठी त्यांनी त्रिरत्न बौद्ध महासंघ या जागतिक चळवळीची स्थापना केली.दसशील पाळणाऱ्या उपासकांचा संघ उभा करून नवीन धम्मसेवक घडवला. आज हा संघ ५२ राष्ट्रांमध्ये व भारतातील ४० केंद्रांमार्फत अविरत धम्मप्रसाराचे कार्य करीत आहे.
    धम्मचारी जिनोदय यांनी प्रभावी शब्दांत भंते उर्गेन संघरक्षित यांचा जीवनपट मांडताना म्हटले की, “डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील खरे आधुनिक धम्मसेवक म्हणजेच भंते उर्गेन संघरक्षित होय.ते डॉ.बाबासाहेबांचे गुरुबंधू असून बोधिसत्वाचे कार्य त्यांनी अचूक ओळखून पुढे नेले.”
    कार्यक्रमात पूजेचे नेतृत्व धम्ममित्र पद्मजा मोटे,धम्ममित्र संघमित्रा कांबळे व धम्ममित्र मीनाताई कीर्तीकर यांनी केले.
    पाहुण्यांचा परिचय धम्ममित्र अशोक कांबळे यांनी करून दिला तर स्वागत धम्ममित्र सुनील कांबळे यांनी केले.
    धम्ममित्र वैभव कीर्तीकर यांनी भंते यांच्या अनुवादित कवितेचे वाचन केले.
    आयु.दिलीप गायकवाड यांनी भंते उर्गेन संघरक्षित यांच्यावर गीत सादर केले.
    कार्यक्रमाचे आभार धम्ममित्र मनोजकुमार सूर्यवंशी यांनी मानले.
    यावेळी धम्ममित्र वैभव कीर्तीकर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर व भंते उर्गेन संघरक्षित यांच्या छायाचित्रांचे मंदिरात दान दिले.
    तसेच उपस्थितांना श्रीखंडपुरीचे भोजनदान दिले गेले.
    या अनोख्या कार्यक्रमाचे उत्तम प्रकारे सूत्रसंचालन धम्मचारी कल्याणदसी यांनी केले.
    कार्यक्रमास धम्ममित्र महिला, पुरुष,धम्मसहाय्यक व बालक अशा सुमारे ९५ बंधू-भगिनींनी उत्स्फूर्त उपस्थिती दर्शविली.

error: Content is protected !!