धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.25 नोव्हेंबर रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 84 कारवाया करुन 60,450 ₹‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“ अवैध मद्य विरोधी कारवाई .”
धाराशिव ग्रामीण पोठाच्या पथकास आरोपी नामे 1)बालाजी उर्फ संभाजी शहाजी पवार, वय 21 वर्षे, रा. भवानीचौक, येडशी ता. जि. धाराशिव हे दि.25.11.2023 रोजी 12.05 वा. सु. भवानीचौक येडशी येथे अंदाजे 7,485 ₹ किंमतीची देशी व गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
धाराशिव शहर पोठाच्या पथकास आरोपी नामे 1)कुणाल अनिल पवार, वय 27 वर्षे, रा. भोसले हायस्कुल तांबरी विभाग धाराशिव ता. जि. धाराशिव हे दि.25.11.2023 रोजी 16.45 वा. सु. आपल्या राहात्या घरासमोर अंदाजे 2,160 ₹ किंमतीचे सिंधी ताडी अम्ली द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आले. तर 2) लताबाई दिलीप आगळे, वय 50 वर्ष रा. इंदीरानगर धाराशिव ता. जि. धाराशिव या दि.25.11.2023 रोजी 18.30 वा. सु. आपल्या राहात्या घरासमोर अंदाजे 960 ₹ किंमतीची 12 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.तर 3) माधुरी अरुण काळे, रा. जुना बसडेपो पारधीपीढी धाराशिव ता. जि. धाराशिव या दि.25.11.2023 रोजी 18.10 वा. सु. तुळजापूर नाका पारधीपीढी येथे अंदाजे 3,200 ₹ किंमतीची 40 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. 4) तानाजी धनसिंग पवार, वय 49 वर्ष रा. इंदीरानगर धाराशिव ता. जि. धाराशिव हे दि.25.11.2023 रोजी 18.20 वा. सु. आपल्या राहात्या घरासमोर अंदाजे 2,280 ₹ किंमतीची 38 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये धाराशिव शहर पो ठाणे येथे स्वतंत्र 4 गुन्हे नोंदविले आहेत.
शिराढोण पोठाच्या पथकास आरोपी नामे 1)गोकुळ रतन लोंढे, वय 27 वर्षे, रा. हिंगनगाव, ता. कळंब जि. धाराशिव हे दि.25.11.2023 रोजी 20.05 वा. सु. आपल्या राहात्या घरासमोर अंदाजे 600 ₹ किंमतीची 10 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये शिराढोण पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
बेंबळी पोठाच्या पथकास आरोपी नामे 1)गोविंद दत्तु सोनटक्के, वय 25 वर्षे, रा. खंडोबा मंदीराजवळ बेंबळी ता. जि. धाराशिव हे दि.25.11.2023 रोजी 17.15 वा. सु. उजनी रोडवरील हॉटेल संगमजवळ बेंबळी येथे अंदाजे 2,340 ₹ किंमतीची देशी विदेशी दारुच्या सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये बेंबळी पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
“ जुगार विरोधी कारवाई.”
कळंब पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान कळंब पोलीसांनी दि.25.11.2023 रोजी 13.55 वा. सु. कळंब पो. ठा. जुने बसस्थानक येथील मोकळ्या जागेत छापा टाकला. यावेळी आरोपी नामे 1)साजीत मुस्ताफा मुंडे, वय 22 वर्षे, रा. शेरे गल्ली, कळंब ता. कळंब जि. धाराशिव हे 13.55 जुने बसस्थानक कळंब येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 430 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये कळंब पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
मुरुम पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान मुरुम पोलीसांनी दि.25.11.2023 रोजी 15.30 ते 17.15 वा. सु. मुरुम पो. ठा. 2 छापे टाकले. यावेळी आरोपी नामे 1)विजय बाबुराव कुंभार, वय 36 वर्षे, रा. सुंदरवाडी ता. उमरगा जि. धाराशिव हे 15.30 वा. सु. विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना समोरील मोकळ्या जागेत सुंदरवाडी शिवार येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 410 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. तर 2)नरसाप्पा सिदाप्पा माकणे, वय 32 वर्षे, भुसणी ता. उमरगा जि. धाराशिव हे 17.15 मुरुम ते अक्कलकोट जाणारे रोडचे बाजूस पान टपरी येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 640 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये मुरुम पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
येरमाळा पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान येरमाळा पोलीसांनी दि.25.11.2023 रोजी 17.20 ते 17.50 वा. सु. येरमाळा पो. ठा. 2 छापे टाकले. यावेळी आरोपी नामे 1)अर्जुन बब्रुवान बारकुल, वय 52 वर्षे, रा. सोनार गल्ली, येरमाळा ता. कळंब जि. धाराशिव हे 17.20 वा. सु. येडेश्वरी मंदीर कमानी समोर पत्राचे शेडसमोर येरमाळा येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 2,600 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. तर 2)अस्लम गफुर तांबोळी, वय 34 वर्षे, रा. बावी, ता. वाशी ह.मु. शिंदे कॉम्प्लेक्स येरमाळा ता. कळंब जि. धाराशिव हे 17.50 येरमाळा बसस्थानक समोरील लमी सलुन दुकानाचे पाठीमागे येरमाळा येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 3,240 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये येरमाळा पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
उमरगा पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान उमरगा पोलीसांनी दि.25.11.2023 रोजी 16.25 वा. सु. उमरगा पो. ठा. एम एस सी बी ऑफीस जवळ याटे कॉम्प्लेक्स च्या समोर उमरगा येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे 1)दिपक डिगंबर सुरवसे, वय 35 वर्षे, रा. भिमनगर ता. उमरगा जि. धाराशिव हे 16.25 एम एस सी बी ऑफीस जवळ याटे कॉम्प्लेक्स च्या समोर उमरगा येथे टाईम बाजार मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 1,260 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये उमरगा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव शहर पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान धाराशिव शहर पोलीसांनी दि.25.11.2023 रोजी 20.00 वा. सु. धाराशिव शहर पो. ठा. राघुचीवाडी शिवारात परशुराम निंबाळकर यांचे शेतातील पत्राचे शेड समोर मोकळ्या जागेत धाराशिव येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे 1)शिवाजी नरहरी चव्हाण, वय 49 वर्षे, रा.बौध्दनगर धाराशिव, 2) सुरज युवराज डाके, वय 32 वर्षे, रा. बायपास रोड धाराशिव, 3) जब्बार शेरचान पठाण, वय 42 रा. रसुलपूरा खिरणी मळा धाराशिव, 4) इक्बाल खॉजामिया अत्तार, वय 35 वर्षे, रा. तुळजाई नगर तुळजापूर, 5) श्रीकांत शरद मोरे, वय 35 वर्षे, रा.फकीरानगर धाराशिव, 6)समद मुसा शेख, वय 39 वर्षे,रा. खाजा नगर धाराशिव, 7)जावेद सत्तार तांबोळी, वय 37 वर्षे,रा. खिरणी मळा धाराशिव, 8) पंकज सुनिल काळे, वय 28 वर्षे, रा. भवानी चौक धाराशिव, 9) कलीम गफुर कुरेशी, वय 45 वर्षे, रा कुरेशी गल्ली धाराशिव, 10) उत्तम गणपत कुंभार, वय 50 वर्षे, रा. कुंभार गल्ली धाराशिव हे 20.00 राघुचीवाडी शिवारात परशुराम निंबाळकर यांचे शेतातील पत्राचे शेड समोर मोकळ्या जागेत धाराशिव येथे तिरट मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 69,030 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये धाराशिव शहर पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
“रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा नोंद.”
बेंबळी पोलीस ठाणे : आरोपी नामे-1)आतिक मुनिर अरब, वय 30 वर्षे, रा. लोहारा, ता.लोहारा जि. धाराशिव यांनी दि.25.11.2023 रोजी 13.15 वा. सु. आपल्या ताब्यातील मॅझिकरिक्षा क्र एमएच 24 ई 9714 हा तुळजापूर ते लातुर जाणारे रोडवर करजखेडा ब्रिज खाली चौकात लोहारा जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना बेंबळी पोलीसांना मिळून आला. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भा.द.स. कलम 283 अन्वये बेंबळी पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.
लोहारा पोलीस ठाणे : आरोपी नामे-1)राजकुमार अशोक उपासे, वय 27 वर्षे, रा. जेवळी दक्षिण, ता. लोहारा जि. धाराशिव यांनी दि.25.11.2023 रोजी 12.15 वा. सु. आपल्या ताब्यातील ॲपे रिक्षा क्र एमएच 25 एम 0724 हा जेवळी बाजार चौकातील रोडवर सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना लोहारा पोलीसांना मिळून आला. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भा.द.स. कलम 283 अन्वये लोहारा पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा पोलीस ठाणे : आरोपी नामे-1)कोंडीबा व्यंकट कोल्हे, वय 44 वर्षे, रा. चंडकापूर ता. उमरगा जि. धाराशिव, यांनी दि.25.11.2023 रोजी 19.15 वा. सु. आपल्या ताब्यातील ॲपे रिक्षा क्र एमएच 25 एम 551 हा एनएच 65 रोडवर बसस्थानक समोर उमरगा येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना उमरगा पोलीसांना मिळून आला. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भा.द.स. कलम 283 अन्वये उमरगा पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.
“ मद्यपी चालकावर गुन्हा दाखल.”
उमरगा पोलीस ठाणे : आरोपी नामे-1) लक्ष्मण नामदेव दुधभाते, वय 55 वर्षे, रा.समता नगर, उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.25.11.2023 रोजी 20.15 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र एमएच 12 एझेड 1226 ही आरोग्य नगरी कॉर्नर येथे एनएच 65 रोडवर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द उमरगा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
ढोकी पोलीस ठाणे : आरोपी नामे-1) अक्षय बळीराम चांदणे, वय 28 वर्षे, रा.सांजा, ता. जि. धाराशिव हे दि.25.11.2023 रोजी 18.50 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र एमएच 25 झेड 6350 ही ढोकी पेट्रोलपंप चौकातुन मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द ढोकी पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
“हायगई व निष्काजीपणे वाहन चालविणाऱ्यांवर गुन्हे दाखल”
तामलवाडी पोलीस ठाणे : सिटी बस डेपो मागे रमाई आंबेडकर नगर सालापूर येथील- मसा अशोक कसबे, वय 35 वर्षे यांनी दि. 25.11.2023 रोजी 16.20 वा. सु. आपल्या ताब्यातील रिक्षा क्रं. एम.एच.13 बीव्ही 0461 हा सोलापूर ते तुळजापूर जाणारे एनएच 52 रोडवर टोलनाक्याजवळ तामलवाडी येथे सार्वजनिक रस्त्यावर लोकांच्या जिवीतास धोका निर्माण होईल अशा हयगयीने व निष्काळजीपणे भरधाव वेगात चालवताना तामलवाडी पोलीसांना आढळले. तसेच वांगी, पां. वडाळा, ता. उत्तर सोलापूर जि. सोलापूर येथील- लक्ष्मण आप्पा वडणे,वय 39 वर्षे यांनी दि. 25.11.2023 रोजी 17.00 वा. सु. आपल्या ताब्यातील छोटा पिकअप ॲपे क्रं. एम.एच.25 एजे 1930 हा सोलापूर ते तुळजापूर जाणारे एनएच 52 रोडवर टोलनाक्याजवळ तामलवाडी येथे सार्वजनिक रस्त्यावर लोकांच्या जिवीतास धोका निर्माण होईल अशा हयगयीने व निष्काळजीपणे भरधाव वेगात चालवताना तामलवाडी पोलीसांना आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम नमूद व्यक्तींविरुध्द भा.द.स. कलम 279 अन्वये तामलवाडी पो. ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
“ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
तुळजापूर पोलीस ठाणे : फिर्यादी नामे- दत्ता बाबुराव माळी, वय 42 वर्षे, रा. वडगाव सि. ता. तुळजापूर, जि. धाराशिव यांचे राहाते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि.23.11.2023 रोजी 21.00 ते दि. 25.11.2023 रोजी 08.00 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन घरातील कपाटातील 7 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व चांदीचे दागिने असा एकुण 31,200 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- दत्ता माळी यांनी दि.25.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे कलम 457,380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला.
उमरगा पोलीस ठाणे : फिर्यादी नामे- बालासुब्रमनियम अरुमय नायगम, वय 30 वर्षे हे सुयोग उर्जा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे विद्युत तार ओढण्याचे काम हंद्राळ, दुधनाळ, कदमापूर येथील उभे राहीलेल्या पवन उर्जा प्रकल्पापासुन कासार शिरशी सबस्टेशन पर्यंत काम चालु असताना दि. 24.11.2023 रोंजी 06.00 ते दि. 25.11.2023 रोजी सकाळी 08.00 वा. सु. कदमापुर शिवारातील झाकडे यांचे शेताजवळ पोलला आडकवुन ठेवलेली विद्युत ॲल्युमिनीयम तार 1000 मिटर अंदाजे 2,00,000 ₹ किंमतीची ही अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- बालासुब्रमनियम नायगम यांनी दि.25.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“ रस्ता अपघात.”
उमरगा पोलीस ठाणे : मयत नामे- आण्णाराव कल्याणी कुंभार, वय 58 वर्षे, 2) सुग्रीव श्रीरंग पाटील, वय 50 वर्षे, दोघे रा. काळनिंबाळा, ता. उमरगा जि. धाराशिव हे दि. 19.11.2023 रोजी 19.30 वा. सु. येळी शिवारातील हायवे रोडवरुन मोटरसायकल क्र एमएच 25 के 1280 वर बसून जात होते. दरम्यान मोटरसायकल क्र एमएच 25 एव्ही 9020 च्या चालकाने त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही भरधाव वेगावत निष्काळजीपणे चालवुन आण्णाराव कुंभार यांचे मोटरसायकलला पाठीमागून धडक दिली. या आपघातात आणणाराव कुंभार व सुग्रीव पाटील हे दोघे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी- दत्तात्रय यशवंत कुंभार, वय 38 वर्षे, रा. बेळंब ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.25.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
परंडा पोलीस ठाणे : मयत नामे- प्रभात तरामी मगर, वय 22 वर्षे, रा. गाव पालीका चुरे, जि कैलाली, ह.मु. समर्थ नगर परंडा ता. परंडा जि. धाराशिव हे दि. 23.11.2023 रोजी 23.00 वा. सु. छत्रपती शिवाजी महाराज चौक परंडा येथुन लालाभाई हॉटेल समोर करमाळा रोड परंडा रोडवरुन मोटरसायकल क्र एमएच 13 डी एस 1554 वर बसून जात होते. दरम्यान ट्रक क्र एमएच 11 एएल 6147 च्या चालकाने त्याचे ताब्यातील ट्रक हा भरधाव वेगावत निष्काळजीपणे चालवुन प्रभात मगर यांचे मोटरसायकलला धडक दिली. या आपघातात प्रभात मगर हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी- नारायण (आबा) भगवान गरदडे, वय 36 वर्षे, रा. परंडा ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि.25.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो. वा. का. कलम 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
ढोकी पोलीस ठाणे : मयत नामे-विमल बबनराव अन्नदाते, वय 60 वर्षे, रा. शिवाजी नगर मुरुड, ता. जि. लातुर या दि.22.11.2023 रोजी 16.00 वा. सु. मल्हार चौक तेर ता. जि. धाराशिव येथुन पायी चालत जात होत्या. दरम्यान ईरटिका गाडी क्र एमएच 46 बीझेड 6162 सिल्हवर रंगाची चालक नामे- स्नेहा दत्तात्रय लांडगे रा. तेर ता. जि. धाराशिव यांनी त्याचे ताब्यातील कार ही भरधाव वेगावत निष्काळजीपणे चालवुन विमल अन्नदाते यांना पाठीमागून धडक दिली. या आपघातात विमल अन्नदाते या गंभीर जखमी होवून मयत झाल्या. अशा मजकुराच्या फिर्यादी- सचिन बबनराव अन्नदाते वय 35 वर्षे, रा. शिवाजी नगर,मुरुम ता.जि. लातुर यांनी दि.25.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो. वा. का. कलम 184 अन्वये गुन्हा नोंदवला.
फसवणूक.”
तुळजापूर पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-दत्ता तुळजाराम कसबे, वय 48 वर्षे, रा. शुक्रवार पेठ मातंग नगर तुळजापूर जि. धाराशिव यांना दि. 23.11.2023 रोजी 11.30 ते 15.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने मी नायब तहसिलदार देशमुख आहे असे सांगून मला तुमची मदत पाहीजे माझे बरोबर तहसिलचे कर्मचारी पण येणार आहे तुळजापूर येथे तीन दिवस धार्मिक विधीचा कार्यक्रम आहे. दररोज 1200 माणसांचे जेवणाचे नियोजन आहे मला सदर कार्यक्रमासाठी किराणा व कपडे खरेदी करण्यासाठी तुमची गरज आहे असे सांगून फिर्यादी व साक्षीदार यांना सोबत नेहुन मंगळवार पेठ येथील भोसले यांचे कपड्याच्या दुकानातुन 1,25,000₹ किंमतीच्या साड्या घेतल्या व सचिन अग्रवाल यांचे दुकानातुन 40,000₹ किंमतीचे किराणा सामान तसेच रोख रक्कम 5,000₹ वसॅमसंग कंपनीचा एस 23 गॅलक्सी मोबाईल 74,999 ₹ असा एकुण 2,44,999₹ किंमतीचा माल घेवून जावून दत्ता कसबे व इतरांची फसवणूक केली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- दत्ता कसबे यांनी दि.25.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे कलम 419, 420 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला