- धाराशिव (जिमाका) – महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी देविजींच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश,कर्नाटक, तेलंगना व इतर राज्यातून भाविक कुलदेवता असल्याने या ठिकाणी कुलाचार व कुलधर्म करण्यासाठी मोठ्या संख्येने भक्तिभावाने येतात.
श्री देविजीची सिंहासन पुजा ही अत्यंत महत्वाची मानली जाते.ही सिंहासन पुजा नोंदणी ऑनलाईन पध्दतीने श्री.तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या अधिकृत संकेतस्थळावर https://shrituljabhavani.org उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
माहे १९ ऑगस्ट मधील सिंहासन पुजा ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्यात येईल याची सर्व भाविक भक्त,महंत,पुजारी,सेवेकरी व नागरीकांनी नोंद घ्यावी.भाविकांनी सिंहासन पुजा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अधिकृत संकेतस्थळ https://shrituljabhavanitempletrust.org यावर सिंहासन पुजा नोंदणीसाठी भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत होती.
माहे ऑगस्ट-२०२५ या महिन्यात सिंहासन पूजेच्या नोंदणीसाठी वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.भाविकांनी सिंहासन पूजेसाठी http://shrituljabhavanitempletrust.org यावरून सिंहासन पूजा पास बुकिंग या मेन्यूवर क्लीक केल्यानंतर https://shrituljabhavanimataseva. org या लिंकवर प्रवेश करून भाविकांनी आपली सिंहासन पुजेची नोंदणी करावी.सिंहासन पुजा नोंदणी २० ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० वाजतापासून सुरू होणार आहे.ती २५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० वाजतापर्यंत करता येईल. ऑनलाईन ड्रॉ पध्दतीने प्रथम सोडत व भाविकांना पेमेंटसाठी एसएमएस २७ ऑगस्ट २०२५ रोजी ११ वाजतापर्यंत पाठविण्यात येतील.भाविकांनी प्रथम सोडतीचे ऑनलाईन पेमेंट २७ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजतापासून ते २८ ऑगस्टपर्यंत सकाळी १० वाजतापर्यंत करावे.
सिंहासन संख्या पूर्ण न झाल्यास ऑनलाईन ड्रॉ पद्धतीने व्दितीय सोडत व भाविकांना पेमेंटसाठी २८ जुन २०२५ रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत एसएमएस पाठविण्यात येतील.
भाविकांनी व्दितीय सोडतीचे ऑनलाईन पेमेंट २८ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ ते २९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेपर्यंत करावे.प्रथम व व्दितीय फेरीत सिंहासन संख्या पूर्ण न झाल्यास ऑनलाईन ड्रॉ पध्दतीने तृतीय सोडत व भाविकांना पेमेंटसाठी २९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजतापर्यंत एमएमएस पाठविण्यात येतील.
भाविकांनी तृतीय सोडतीचे ऑनलाईन पेमेंट २९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते ३० ऑगस्ट रोजी रोजी सकाळी १० वाजतापर्यंत करावे.
माहे ऑगस्ट-२०२५ या महिन्यातील अंतीम सिंहासन पुजा बुकींग झाल्याची यादी ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रसिध्द करण्यात येईल.सर्दीय नवरात्र महोत्सवात श्री देवीजींची मंचकी निद्रा असलेले दिनांक १५ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर या कालावधीत सिंहासन पूजा बंद राहणार आहे.
भाविकांनी वरीलप्रमाणे ऑनलाईन पध्दतीने सिंहासन पुजा नोंदणीचा लाभ घ्यावा.असे आवाहन श्री तुळजाभवानी मंदिर,संस्थान तुळजापूर तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) यांनी केले आहे.
More Stories
ओबीसी शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांसाठी आमदार प्रवीण स्वामी सरांची सकारात्मक भूमिका – समाधानाचा नवा किरण
न्यायापासून वंचित असलेल्यांना न्याय मिळावा – न्या.प्रसन्न वराळे
पी एम श्री कन्या प्रशाला तुळजापूरच्या मुलींचा जिल्हा क्रीडांगणावर झंकार — तीन संघ विभागीय पातळीवर दाखल!