लातूर – खरोसा येथील ऐतिहासिक व धार्मिक दृष्ट्या महत्त्वाच्या बुद्ध लेणी येथे आंतरराष्ट्रीय स्तरावरील वर्षावास कार्यक्रम संपन्न झाला.बौद्ध धम्माचा प्रसार व प्रचार हा प्रमुख उद्देश ठेवून झालेल्या या कार्यक्रमात कंबोडिया, व्हिएतनाम,थायलंड आणि भारतातील बौद्ध भिक्खू संघाने सहभाग नोंदविला.शांत व पवित्र वातावरणामुळे कार्यक्रमाला अधिक शोभा प्राप्त झाली. या कार्यक्रमाचे प्रमुख सूत्रधार वंदनीय भन्ते सुमेधजी नागसेन होते.त्यांच्या मार्गदर्शनातून आणि परिश्रमातून या ऐतिहासिक स्थळी आयोजित वर्षावासामुळे स्थानिक समाजाला आपल्या धार्मिक व सांस्कृतिक वारशाची आठवण झाली.भिक्खूंनी दिलेल्या प्रवचनांद्वारे शील,समाधी आणि प्रज्ञा या बौद्ध तत्त्वज्ञानाची ओळख करून दिली.तसेच ध्यान साधना, बुद्ध पूजा व सांस्कृतिक उपक्रमांतून करुणा,शांतता आणि एकतेचा संदेश प्रभावीपणे पोहोचविला.
खरोसा व परिसरातील स्थानिक बौद्धांसह इतर समाजघटकांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन कार्यक्रमाला सामाजिक आधार दिला.दान व सेवेच्या कार्यातून त्यांनी बौद्ध संस्कृतीचा अनुभव प्रत्यक्ष घेतला.विविध देशांतील भिक्खू व स्थानिक समाज यांच्या समन्वयातून धम्म प्रसाराला जागतिक परिमाण प्राप्त झाले. या कार्यक्रमामुळे महाराष्ट्रातील बौद्ध समाजास नवी प्रेरणा मिळाली असून, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बौद्ध चळवळीशी जोडलेल्या खरोसा लेणी येथे धम्माच्या पुनरुज्जीवनाचा नवा अध्याय सुरू झाला आहे.
More Stories
आई-वडिलांमुळेच आपल्या अस्तित्वाची ओळख –डॉ.सुनील गायकवाड
खरोसा लेणी येथे माघ पौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा;६५ धम्म अनुयायांचा सहभाग
सिध्देश्वर यात्रा महोत्सवाची गौरवशाली परंपरा वृंध्दिगत करावी – विश्वस्त विक्रम गोजमगुंडे