March 26, 2026

रॅगिंग प्रतिबंधात्मक या पथनाट्यातून जनजागृती – प्रा.हेमंत भगवान

  • कळंब – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय,कळंब येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि अँटी रॅगिंग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने
    रॅगिंगला प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने आठवडाभर अँटी रॅगिंग सप्ताह राबवण्यात येत आहे.या अंतर्गत १२ ते १८ ऑगस्टदरम्यान महाविद्यालयात विविध उपक्रम राबवले जात आहेत.
    या निमित्ताने महाविद्यालयात दिनांक १४ ऑगस्ट २०२५ रोजी पथनाट्य सादरीकरण करून जनजागृती केली.यात तीन समुहांनी सादरीकरण केले.प्रथम समूह झीनत मुल्ला,तेजस्विनी गुजर,अनुजा थोरबोले,सुजाता तेलंग ,द्वितीय समूह धनश्री करंजकर,दृष्टी कोठावळे,सारिका कांबळे,प्रतीक्षा गायकवाड,समीक्षा तसेच समूह तीन भैरवी पवार, संजीवनी ठाकूर,दृष्टी कोठावळे, काजल सोनवणे,प्रतीक्षा गायकवाड,दिशा धीरे ,
    या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी महाविद्यालयाच्या परिसरात “say no to ragging “असे आवाहन केले,अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक प्रा.अर्चना मुखेडकर यांनी महाविद्यालयाच्या परिसरात शिस्तीचे पालन करून कोणतेही बेजबाबदार कृत्य न करण्यासाठी सूचित केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.दत्ता साकोळे केले, यावेळी विद्यार्थ्यांना रॅगिंग प्रतिबंधक कायदा याविषयी माहिती दिली.आभार प्रा.विश्वजीत म्हस्के यांनी केले.आयोजन प्रा.दादाराव गुंडरे,डॉ.मीनाक्षी जाधव,प्रा.सरस्वती वायभसे यांनी केले.याप्रसंगी अँटी रॅगिंग समितीचे चेअरमन तसेच संस्थेचे संचालक डॉ.संजय कांबळे यांनी
    अँटी रॅगिंग कायदा तयार करण्यामागची पार्श्वभूमी विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. त्यामध्ये अँटी रॅगिंग वेबसाइट, टोल फ्री क्रमांक,तक्रार नोंदणी प्रक्रिया इत्यादी बाबींचा समजावून सांगितल्या. तसेच विद्यार्थांनी रॅगिंग प्रतिबंधात्मक पथनाट्य सादर करून रॅगिंगविरोधी जनजागृतीसाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे.शिक्षण, जागरूकता,सक्रिय सहभाग, सोशल मीडियाचा वापर,आणि कठोर कारवाईच्या माध्यमातून रॅगिंगमुक्त शिक्षण संस्था निर्माण करता येतील अशी
    जनजागृती महाविद्यालय परिसरात करण्यात आली.
    सदस्य हनुमंत जाधव ,डॉ.चिंते, डॉ.सूर्यवंशी,डॉ.राठोड,
    डॉ.वेदपाठक, डॉ.भोसले,डॉ.वाळके,प्रा.देवकत्ते, डॉ.सरवदे, प्रा.पांचाळ,डॉ.पंडित, डॉ.वाघमारे,डॉ.बालाजी वाघमारे , डॉ.ताटीपामुल, डॉ. अदाटे,प्रा.राऊत, प्रा.शेख,प्रा. मडके,डॉ.महाजन, प्रा.खंडागळे,प्रा.शेळके,प्रा.काकडे, डॉ.लोहकरे ,प्रा.घाटपारडे , प्रा.आडसुळ मॅडम,प्रा.टिपरसे उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अरविंद शिंदे आणि अँटी रॅगिंग समिती सदस्यांनी परिश्रम घेतले.
error: Content is protected !!