संत ज्ञानेश्वर माऊली जयंतीनिमित्त मोहा विद्यालयात सामूहिक पसायदान मोहा – संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त दि.१४ ऑगस्ट २०२५ रोजी ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक तथा प्राचार्य अविनाश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मोहा येथे सामूहिक पसायदानाचे भव्य आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहशिक्षक सतीश मडके यांनी केले. या वेळी प्रमुख उपस्थिती म्हणून मुख्याध्यापक तथा प्राचार्य अविनाश मोरे,पर्यवेक्षक सतीश कानगुडे व उच्च माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक प्रा.सुनील साबळे हे मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.नवनाथ करंजकर,सहशिक्षक डी.बी. मडके,संजय आडणे,सूर्यकांत गुंगे, शैलेश गुरव,जनार्दन भामरे, कमलाकर शेवाळे,अशोक राऊत, मंगलदास पवार,ज्योतिराम सोनके,आर.एन.चिलवंत, प्रा. विठ्ठल जाधव,प्रा.राहुल भिसे, प्रा. अमित जाधव,प्रा.देवदत्त पाटील, प्रा.दिग्विजय पाटील,प्रा.श्रीमती प्रतिभा सावंत,प्रा.रोहित मोहेकर, प्रा.चंद्रशेखर गिरी,श्रीमती निता सोनवणे,श्रीमती उषा पांचाळ, अमितकुमार शर्मा,धनंजय परजणे, अनूप पाटील,अमरसिंह पाटील, बी.एम.काळे,दिगांबर शिंदे,अंगद आगलावे,विष्णू जाधव,ज्ञानोबा टोपे,प्रथमेश साडेकर आदी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमात संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञान,भक्ति व समाजसेवेच्या संदेशाचा गौरव करण्यात आला आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या आदर्श जीवनातून प्रेरणा घेण्याचे आवाहन करण्यात आले.
More Stories
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना ज्ञान प्रसार विद्यालयात भावपूर्ण अभिवादन
ज्ञान प्रसार प्राथमिक विद्यालय मोहा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन
शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना ज्ञान प्रसार विद्यालयात भावपूर्ण अभिवादन