February 8, 2026

भोसले विद्यालय मातोळाच्या मुलीचा MBBS मध्ये डंका

  • गुंड गीता बिरूची सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात निवड
  • मातोळा – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व प्राचार्य अजित साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. माधवराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मातोळा ता.औसा,जि.लातूर येथे इयत्ता नववी ते बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या गुंड गीता बिरू हिने राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश परीक्षा (NEET) पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होऊन MBBS अभ्यासक्रमासाठी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून गाव व शाळेचा गौरव वाढविला आहे.
    या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अनिल (बापू) मोहेकर,सचिव डॉ. अशोकराव मोहेकर,संचालक संजय भोसले,शालेय समितीचे अध्यक्ष दिगंबर भोसले,प्राचार्य अजित साळवे,पर्यवेक्षक डबे तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने गीता हिचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.तिच्या उज्ज्वल शैक्षणिक भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.
error: Content is protected !!