February 8, 2026

परदेशातून अनुभवांची शिदोरी;डॉ.अशोकराव मोहेकरांचा ज्ञान प्रसारक मंडळात दिमाखदार सत्कार!

  • येरमाळा – शिक्षण क्षेत्रात नवे क्षितिज गाठण्याचा संकल्प आणि परदेशातून घेतलेली ज्ञानाची शिदोरी… याच प्रेरणादायी प्रवासाचा सन्मान करण्यासाठी ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांचा सोमवारी ज्ञानोद्योग विद्यालयात मान्यवरांच्या हस्ते दिमाखदार सत्कार करण्यात आला.
    दि.११ ऑगस्ट २०२५ रोजी ज्ञान प्रसारक मंडळ संचलित ज्ञानोद्योग विद्यालयात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांची सहविचार सभा आणि शालेय प्रवेश आढावा बैठक मोठ्या उत्साहात पार पडली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. आबासाहेब बारकुल (उपाध्यक्ष, ज्ञान प्रसारक मंडळ) होते. यावेळी शालेय समिती अध्यक्ष भाऊसाहेब बारकुल,कोषाध्यक्ष अंकुश पाटील, प्राचार्य प्रा.सुनिल पाटील,जेष्ठ समाजसेवक रंजीत बारकुल, शा.स.सदस्य डी.आर.बारकुल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
    सहविचार सभेचे प्रस्ताविक अनिल शिंदे यांनी केले.डॉ.अशोक मोहेकर यांनी परदेश दौऱ्यातील अनुभव,जागतिक शिक्षण पद्धतीतील नवकल्पना आणि संस्थेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आवश्यक दिशा याबाबत सखोल व अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.
    यानंतर प्राचार्य सुनिल पाटील आणि डॉ.अमर बारकुल यांनीही आपल्या मनोगतातून प्रेरणादायी विचार मांडले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागप्रमुख डी.बी.मोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन संदीप पेजगुडे यांनी मानले.
    शिक्षणासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या डॉ.मोहेकरांचा हा सत्कार उपस्थितांसाठी अभिमानाचा व प्रेरणादायी ठरला.
error: Content is protected !!