1 आगस्ट 2025 रोजी 105 वी जयंती साजरी होत आहे,या लेखकाला ञिवार मानवंदना,डॉ.अण्णाभाऊ साठे हे जागतिक दर्जाचे लेखक आहेत,त्यांनी कथा,कांदबर्या,शाहिरी, लोकनाट्य,प्रवासवर्णन,या विविध वाङमय प्रकारात विपुल लेखन केले.एकुणच मध्यमवर्गीय चिञणाला फाटा देवून डॉ.अण्णाभाऊनी वास्तवदर्शी,व सजीव सच्च्या भावविश्वात परावर्तीत केले.मराठी कांदबरीला जागतिक दर्जा प्रात्प करून देवून वंचित,शोषितांचे व श्रमिक साहित्याचे निर्माते झाले. डॉ.अण्णाभाऊंनी दलित,पिडित अशा सामान्य माणसाला केंद्रस्थानी आणले यांनाही जीवनमुल्ये असतात हे सिध्द करून दाखविले. समता,मानवता,यांसाठी त्यांच्या कादंबरीतील नायक वेळप्रसंगी प्राणाची “आहुती” देतात.डॉ.अण्णाभाऊ साठे हे नाव अर्वाचीन मराठी साहित्यात अनेक अर्थानी महत्वपुर्ण व वैशिष्ट्यपुर्ण आहे.त्यांच्या साहित्याने जगण्याला प्रेरणा दिली,आणी वास्तववादी जगणं स्पष्ट केलं आहे. दलित,शोषित,पिडीत अशा सामान्य माणसाला केद्रंस्थानी आणुन त्यांनी सुख-दु:ख उजागर करुन वास्तव समाजदर्शन उभे केले. मराठी सारस्वताने गेल्या दोन शतकात अनेक लेखक,कवी व नाटककार पाहिले आहेत, परंतु अपवाद वगळता मराठी लेखकामधे पौर्वात्य व पाश्चीमात्य वाङमयीन दंडकाचा वापर करुन लिखाण करण्याची प्रवृत्ती दिसते.लेखनविषयक नायक व गौरवीकरण हा लेखनाचा प्रमुख हेतु दिसतो.भारतीय समाज वर्णव्यवस्थेच्या कुलुपबंद पेटीमधे जखडलेला असल्यामुळे विषयवास्तु व नाटकत्व हे नेहमीच उच्चवर्णीयांच्या मूल्यव्यवस्थेला धरुन असते.आणि बर्याच वेळेस स्वातंञ्य,समता,बंधुता,आणि न्याय यांच्या कसोट्यावर बहुजन मूल्यव्यवस्था ही अभिजन मूल्यव्यवस्थेला वरचढ ठरते,कारण विषमतेवर विश्वास ठेवण्यापेक्षा समतेची निकड दलित व श्रमिक वर्गाला,”भाकरीच्या चद्रांसाठी” संघर्ष करतानाच आपली मूल्यव्यवस्था जपावी आणि वाढवावी लागते”.तत्कालीन समाजमनाची स्पंदने डॉ.अण्णाभाऊसाठे यांच्या कादंबरीतुन अविष्कृत होतात.कल्पनाविलासापासुन दूर असलेले डॉ.अण्णाभाऊंचे कादंबरीलेखन माणसाचे वास्तव जगणे सांगून जाते. उपेक्षित,वंचित,श्रमिक,कामगार, आणि प्रस्थापितांच्या विरोधात संघर्ष हा लेखनाचा आत्मा आहे. समकालीन भवताल अधोरेखित करताना डॉ.अण्णाभाऊंच्या लेखनीची शाई सदैव संवेदनशीलच राहिली आहे.याचे चिञण वारणेच्या खोर्यात”,चिञा,फकिरा,वैजयंता,चंदन,आवडी,माकडीचा माळ,वैर, गुलाम,रानगंगा,पाझर,अलगुज,मास्तर,कुरुप,तारा, वारणेचा वाघ, मूर्ती, अग्निदिव्य,आणि मयुरा इ.कादंबर्यातून समकालीन जीवनदर्शन व मूल्यात्मक जगणं हा या कादंबर्याचा विशेष होय. डॉ.अण्णाभाऊनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत चिरागनगर सारख्या झोपडीत राहुन विपुल आणि दर्जेदार लेखन केले.डॉ.अण्णाभाऊचे साहित्य कवडीमोल भावाने विकत घेवुन त्यावर अनेक प्रकाशक व दिग्दर्शक लक्षाधीश झाले,पण डॉ.अण्णाभाऊच्या वाट्याला माञ जिवंत असतानाही व आजही उपेक्षाच वाट्याला आली.अण्णाचे साहित्य केवळ मराठीच नव्हे,तर ‘जागतिक साहित्याचा अनमोल ठेवा आहे’.त्यांच्या साहित्यातील नायक व नायिका हे प्रतिनायक किंवा नायक नाहीत,तर ते प्रतिकुल परिस्थितीतही स्वातंञ्य व न्यायासाठी प्राणार्पण करायला तयार असणारे धीरोदात्त नायक आहेत.म्हणुन अण्णाभाऊचे साहित्य जगातल्या अभिजात साहित्याच्या तुलनेत उजवेच ठरते.अर्थिक कुचंबणा,सामाजिक अप्रतिष्ठा,उच्चवर्णीयाकडुन होणारा अन्याय यातूनही माणुसपण जपणार्या अण्णांनी रेखाटलेली पाञे सामान्य माणसाच्या जगण्याला बळ देतात.वाट्याला आलेल्या प्रतिकूल परिस्थीतीशी संघर्ष करीत दु:खाचे पहाड उचलत शोषित पीडितांचे जगणे साहित्यात अधोरेखीत केले.शाहीरी, कथा,कादंबर्या,लोकनाट्य,प्रवासवर्णन,पटकथा,इ.साहित्यप्रकारात लेखन करून माणसातील माणुसपण जपले.सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या जीवनातील व्यथा वेदना लेखनातून मोकळ्या केल्या.दबलेल्या,पिचलेल्या, पिळलेल्या,नागवलेल्या, माणसातला माणुस पुढे आणला , अन् अन्याय अत्याचार करणार्याचा बुरखा फाडला. 1 आगस्ट 1920 रोजी वाटेगाव,जिल्हा सांगली येथे जन्मलेल्या अण्णाभाऊ साठे यांचे 18 जुलै 1969 ला मुंबईत निधन झाले.अवघे 49 वर्ष आयुष्य जगलेल्या या साहित्यसम्राटाने आपले नाव जागतिक स्तरावर अजरामर केले.भारत सरकारने डॉ.अण्णाभाऊंना “साहित्यक्षेञातील ‘भारतरत्न’ हा किताब मरणोत्तर देवुन,या संयुक्त महाराष्टाच्या चवळीच्या शिलेदारास,लोकशाहीरास सन्मान देवून गुणगौरव करावा ही सदिच्छा .105 वी जयंतीनिमित्त अण्णाभाऊंना ञिवार मानवंदना, अभिवादन!!!
— डी.बी.मोरे ईटकुरकर (सहशिक्षक) ज्ञानोद्योग विद्यालय येरमाळा,ता. कळंब जि.धाराशिव.
More Stories
ज्ञानोद्योग विद्यालयात ‘स्वयंशासन दिन’ उत्साहात साजरा!
स्त्री शिक्षणाच्या जननींना अभिवादन;ज्ञानोद्योग विद्यालयात जयंतीनिमित्त सांस्कृतिक उपक्रम संपन्न
येरमाळ्यात लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांची जयंती सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरी