February 8, 2026

जागतिक शांतीची प्रेरणाभूमी भारत – थाईलँडच्या भिक्खु अनालयो थेरो

  • भारतीय बौद्ध अनुयायांकडून भव्य संघदान
  • लातूर – “बौद्ध धम्म हा करुणा, मैत्री आणि शांतीचा संदेश देणारा वैश्विक धम्म आहे.तथागत बुद्धांच्या नीतीशास्त्रातून जगाचे कल्याण होईल.बुद्धांमुळे भारताची जगात विशेष ओळख निर्माण झाली असून भारत ही जागतिक शांतीची प्रेरणाभूमी आहे,” असे उद्गार थाईलँड येथील भिक्खु अनालयो थेरो यांनी काढले.
    बौद्ध धम्म संस्कार प्रशिक्षण चॅरिटेबल ट्रस्टतर्फे श्रावण पौर्णिमेनिमित्त महाविहार, सातकर्णी नगर,रामेगाव (ता. जि. लातूर) येथे आयोजित धम्मदेशना व संघदान कार्यक्रम उत्साहात पार पडला. प्रारंभी थाई भिक्खु संघ आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मंगलमय वातावरणात थाई भिक्खु संघाने परित्राण पाठ करून उपस्थितांना आशीर्वाद दिला.
    कार्यक्रमास समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड,धाराशिव जि.म.स. बँकेचे उपाध्यक्ष व माजी सभापती कैलाश शिंदे,देवानंद मानखेडकर, प्रा.देवदत्त सावंत,राजे सवाई, सुरेश कालेकर,संजय माकेगावकर यांसह मान्यवर उपस्थित होते. विशेष सत्काराने कार्यक्रमाला मंगल स्पर्श मिळाला.
    धम्मदेशनेत भिक्खु अनालयो थेरो यांनी बुद्धांच्या करुणा,शांती आणि मैत्रीच्या संदेशाचा जागतिक प्रभाव उलगडून सांगितला.भिक्खु पय्यानंद थेरो यांनी श्रावण पौर्णिमेचे महत्त्व विशद करून, प्रत्येक बौद्ध अनुयायाने बुद्धांच्या नैतिक जीवनमार्गाचे आचरण करण्याचे आवाहन केले.
    भारतीय बौद्ध अनुयायांनी थाई भिक्खु संघाला जीवनावश्यक वस्तूंचे भव्य संघदान केले.महिला मंडळाच्या वतीने सर्व उपस्थितांना भोजनदानाची सेवा देण्यात आली.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक केशव कांबळे यांनी तर सूत्रसंचालन प्रा. देवदत्त सावंत यांनी केले. यशस्वीतेसाठी भिक्खु बोधीराज, उदय सोनवणे,मिलिंद धावरे, ज्योतीराम लामतुरे,पांडुरंग अंबुलगेकर,विलास अवशंक,प्रा. विश्वनाथ आल्टे,प्रा.सतिश कांबळे, संतोष कसबे,सतीश मस्के, अनिरुद्ध बनसोडे,परमेश्वर आदमाने यांनी परिश्रम घेतले.
    या प्रसंगी एम.एन.गायकवाड, जी.एस.साबळे,प्राचार्य डॉ.दुष्यंत कटारे,प्राचार्य डॉ.संजय गवई, सुशील चिकटे,भीमराव चौदंते, सिद्धार्थ सूर्यवंशी,राजकुमार गंडले, कुमार सोनकांबळे आदींसह मोठ्या संख्येने बौद्ध उपासक-उपासिका उपस्थित होते.
error: Content is protected !!