August 10, 2025

ग्रंथालयाच्या अभ्यासकांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे – प्रा.डॉ.धर्मराज वीर

  • मोहेकर महाविद्यालयात एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न
  • कळंब – ज्ञान प्रसारक मंडळ, येरमाळा संचलित शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय,  गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालय, परंडा आणि सॉफ्टटेक सोल्यूशन्स,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र “ज्ञानाचे संरक्षण : ग्रंथालयात डिजिटल संग्रहण” या विषयावर आयोजित करण्यात आले होते. 
  • याप्रसंगी बीजभाषण करताना प्रा. डॉ.धर्मराज वीर (संचालक, ज्ञानस्त्रोत केंद्र डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर) म्हणाले, “महाविद्यालयाच्या ग्रंथालयाच्या  अभ्यासकांची आणि ग्रंथपालाची जबाबदारी निश्चितच वाढलेली आहे.वाचकांना मार्गदर्शन करण्याची भूमिका पार पाडण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज आहे, त्यासाठी अद्ययावत व्हावे लागणार आहे.त्यांना ग्रंथालयाच्या क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.त्यासाठी प्रचंड कष्ट करून आपली गुणवत्ता सिद्ध करून वाचनसंस्कृती रुजविण्याठी प्रयत्न करावेत.आजच्या जागतिक स्पर्धेमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानात प्रचंड प्रगती झालेली आहे.”
  •       कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे संस्थापक पूज्य ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या आणि ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ.एस.आर.रंगनाथन यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.आबासाहेब बारकुल (उपाध्यक्ष, ज्ञान प्रसारक मंडळ,येरमाळा) तर प्रमुख उद्घाटक ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संस्थेचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर,डॉ.सुभाष चव्हाण(एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ,मुंबई),डॉ.दया पाटील (ग्रंथपाल,एस.बी.ए.एस. कॉलेज, महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर), डॉ.प्रल्हाद जाधव(सहयोगी संचालक, केतान आणि कंपनी),चेतन टाकसाळे (सॉफ्टटेक सोल्यूशन्स, पुणे) उपस्थितीत डॉ.संजय कांबळे (अधिसभा सदस्य तथा संस्थेचे संचालक) होते. यामध्ये महाराष्ट्रातील ७१ संशोधकानी नाव नोंदणी केली आणि १७ जणानी आपले शोध निबंध सादर केले.
  •   यावेळी  ज्ञान प्रसारक मंडळ संस्थेचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर आणि संजय निंबाळकर, सचिव जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळ,धाराशिव यांच्या मार्गदर्शनातून आयोजन करण्यात आले आहे. 
  • यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. हेमंत भगवान,उपप्राचार्य डॉ.के.डी.जाधव,ग्रंथपाल अनिल फाटक या विविध मान्यवरांची उपस्थिती होती.यानिमित्ताने कै. ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या स्मरणार्थ – सर्वोत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथपाल -२०२५ आणि सर्वोत्कृष्ट संशोधक ग्रंथपाल पुरस्कार-२०२५ दोन पुरस्कार देण्यात येणार आहेत. अनुक्रमे स्मृतिचिन्ह, प्रशस्ती पत्र आणि रोख पाच हजार/ तीन हजार रुपयांची पुस्तके देऊन गौरविण्यात आले. यावेळी ऑनलाईन स्वरूपात प्रोसीडिंगचे प्रकाशन करण्यात आले.यानिमित्ताने इयत्ता दहावीच्या एकूण शंभर विद्यार्थ्याला स्टडी ऍपचे वाटप करण्यात आले.
  •   डॉ.राहुल देशमुख यांनी प्रास्ताविक तर उदघाटन सत्राचे प्रा.डॉ.दादाराव गुंडरे यांनी आभार डॉ. दत्ता साकोळे यांनी आणि समारोपप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे सहसचिव भागवत गव्हाणे, प्राचार्य डॉ. सुनिल जाधव, (गुरुवर्य रा.गे. शिंदे महाविद्यालय, परंडा) उपस्थित होते. सत्राचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.दीपक सूर्यवंशी यांनी केले शेवटीस दिवसभराच्या चर्चासत्राचे सारांश रूपाने आभारप्रदर्शन ग्रंथपाल प्रा.अनिल फाटक यांनी केले. 
  •  या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अधीक्षक हनुमंत जाधव आणि ग्रंथालयीन कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.यावेळी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!