August 8, 2025

कळंब येथील महात्मा फुले चौकाच्या सुशोभीकरणासाठी आमदारांकडे निधीची मागणी

  • कळंब – कळंब शहरातील तहसील कार्यालयासमोरील चौकास नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषद मासिक सभेत ठराव क्रमांक २४३ नुसार ‘महात्मा फुले चौक’ असे अधिकृत नामकरण करण्यात आले आहे.
    यापुढील टप्प्यात या चौकाचे सुशोभीकरण करण्यात यावे, तसेच क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीमाई फुले यांचे शिल्प उभारण्यात यावे,अशी मागणी क्रांतीसूर्य महात्मा फुले चौक पुतळा कृती समिती,कळंब यांच्यावतीने करण्यात आली आहे.
    सदर मागणीचे निवेदन स्थानिक आमदार कैलास घाडगे पाटील यांच्याकडे देण्यात आले.यावेळी आमदार महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद देत सांगितले की, “या सुशोभीकरणासाठी योग्य जागेची व शिल्पाची लवकरात लवकर निश्चिती करावी.माझ्या कार्यालयातून निधी मंजुरीसाठीचे पत्र घेऊन जावे,मी पूर्ण सहकार्य करीन,” असे आश्वासन दिले.
    या प्रसंगी कृती समितीचे अध्यक्ष टी.जी.माळी,पांडुरंग कुंभार, डॉ. राजेंद्र गोरे,अरुण माळी,बिभीषण यादव,संतोष भोजने,डॉ.संजय कांबळे,हरिभाऊ कुंभार,शहाजी शिरसट,प्रवीण यादव,सतपाल बचुटे,मोहन पौळ,भरत शिंदे,अजय यादव आदी मान्यवर उपस्थित होते.
    या उपक्रमामुळे कळंब शहरातील सामाजिक परिवर्तनाचे प्रतिक असलेल्या महात्मा व सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा सन्मान साधता येणार असून,युवकांमध्ये सामाजिक जागृतीही निर्माण होईल,असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
error: Content is protected !!