कळंब (राजेंद्र बारगुले) – तालुक्यातील पिंपळगाव (डोळा) येथील ग्रामपंचायतच्या वतीने लोकशाहीर साहित्यसम्राट डॉ. अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भागवतराव धस यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत अभिवादन केले. या प्रसंगी उपसरपंच उमेश धस, रोजगार सेवक सौदागर जगताप, शिवाजी घोडके,संदीप दहीरे, वव्हॉईस ऑफ मीडियाचे छायाचित्रकार राजाभाऊ कांबळे,पत्रकार अमोल बारगुले यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले होते.यावेळी उपस्थित मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक आणि साहित्यिक योगदानाचा उजाळा देत त्यांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले.
More Stories
मैनाक घोष मुख्य कार्यकारी अधिकारी, पिंपळगाव घरकुल लाभार्थ्यांच्या दारी..!
गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान केल्यानं इतर विद्यार्थी प्रेरित होतात – भागवतराव धस
गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान केल्यानं इतर विद्यार्थी प्रेरित होतात – भागवतराव धस