August 8, 2025

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने पांडुरंग कुंभार व शिंदे यांचा सत्कार

  • कळंब – अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद शाखा कळंब च्या वतीने महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटीच्या प्रदेश सचिव पदी नियुक्ती झाल्याबद्दल पांडुरंग (तात्या) कुंभार व भाजपा तालुका उपाध्यक्ष पदी दामोदर शिंदे यांची निवड झाल्याबद्दल अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.शरद गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली साहित्य परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष परमेश्वर पालकर यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला.यावेळी साहित्य परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष परमेश्वर पालकर,कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र बिक्कड मुख्यध्यापक,दामोदर शिंदे,जिल्हाध्यक्ष अशोक कुरुंद,कळंब तालुकाध्यक्ष आश्रुबा कोठावळे, कार्याध्यक्ष सोपान पवार,नारायण बाकले,पत्रकार प्रविण तांबडे,रमेश अंबिरकर,प्रदीप यादव व डॉ. अशोक शिंपले,मोराळे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रस्ताविक परमेश्वर पालकर यांनी केले,सूत्रसंचालन आश्रुबा कोठावळे यांनी केले तर आभार प्रदीप यादव यांनी मानले.
error: Content is protected !!