कळंब – ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेतून आणि शाळेचे मुख्याध्यापक सुभाष लाटे यांच्या प्रभावी मार्गदर्शनाखाली विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर, कळंब या शाळेतील विद्यार्थी सुमित अंगद मिटकरी याने NEET (राष्ट्रीय वैद्यकीय प्रवेश परीक्षा) मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले. या गौरवाच्या क्षणाचे औचित्य साधून,दिनांक २३ जुलै २०२४ रोजी शाळेतर्फे सुमितचा यथोचित सत्कार करण्यात आला.सत्कार समारंभात मुख्याध्यापक सुभाष लाटे यांच्या हस्ते त्याला सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देण्यात आला. या कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी, आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.सुमितच्या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची उजळणी झाली असून, इतर विद्यार्थ्यांसाठी तो आदर्श ठरत आहे,असे गौरवोद्गार यावेळी व्यक्त करण्यात आले. सुमितचा हा यशस्वी प्रवास शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे व शिस्तशीर वातावरणाचे प्रत्यक्ष फलित आहे.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले