धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.21 नोव्हेंबर रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 117 कारवाया करुन 85,850 ₹‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“ अवैध मद्य विरोधी कारवाई .”
उमरगा पोठाच्या पथकास आरोपी नामे 1)लक्ष्मण महादेव माने, वय 38 वर्षे, रा. बेडगा, ता. उमरगा जि.धाराशिव हे दि.21.11.2023 रोजी 11.30 वा. सु. आपल्या राहात्या घरासमोर अंदाजे 850 ₹ किंमतीची गावठी दारु 10 लि. अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. तर 2) व्यंकट शंकर कुरनुरे, वय 58 वर्ष रा. कसगीवाडी, ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.21.11.2023 रोजी 17.20 वा. सु. उमरगा ते कसगी जाणारे रोडलगत हवा मल्लिनाथ महाराजांचे मठासमोर अंदाजे 10,000 ₹ किंमतीची 100 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये उमरगा पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदविले आहेत.
येरमाळा पोठाच्या पथकास आरोपी नामे 1)महादेव नामदेव ओव्हाळ, वय 43 वर्षे, रा. भिमनगर कळंब ता. कळंब जि.धाराशिव हे दि.21.11.2023 रोजी 15.30 वा. सु. तेरखेडा येथील स्मशानभुमी जवळ कडकनाथ वाडी रोड येथे मोकळ्या जागेत अंदाजे 840 ₹ किंमतीची देशी विदेशी दारुच्या 12 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये येरमाळा पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
लोहारा पोठाच्या पथकास आरोपी नामे- रवि नारायण निराला, वय 50 वर्ष रा. वउगाव ता. लोहारा जि. धाराशिव हे दि.21.11.2023 रोजी 18.55 वा. सु. कवलासपुर पांढरी ते वडगाव गांजा जाणारे रोडचे बाजूस असलेले हॉटेल दुर्गामाता धाबा च्या पाठीमागे अंदाजे 1,820 ₹ किंमतीची देशी विदेशी दारुच्या 26 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये लोहारा पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
मुरुम पोठाच्या पथकास आरोपी नामे- राजकुमार निलाप्पा कोळी, वय 29 वर्षे रा.महादेव नगर मुरुम ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.21.11.2023 रोजी 19.45 वा. सु. विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना सुंदरवाडी समोरील मोकळ्या जागेत अंदाजे 900 ₹ किंमतीची 9 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये मुरुम पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
“ जुगार विरोधी कारवाई.”
नळदुर्ग पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान नळदुर्ग पोलीसांनी दि.21.11.2023 रोजी 14.15 ते 15.20 वा. सु. नळदुर्ग पो. ठा. 3 छापे टाकले. यावेळी आरोपी नामे 1)खबुल निजाम जमादार, वय 44 वर्षे, रा. जळकोट ता. तुळजापूर जि. धाराशिव हे 14.15 जळोट येथे जय भावानी मोबाईल शॉपीचे बाजूला आडोशाला कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 1,725 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. तर 2)नेताजी शिवाजी गंगणे, वय 50 वर्षे, जळकोट ता. तुळजापुर जि. धाराशिव हे 14.45 जळकोट येथे विजय किराणा दुकानाचे बाजूला आडोशाला कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 2,345 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. 3)जमीर महेबुब वुडचणे, वय 27 वर्षे, मुरुम, ता. उमरगा जि. धाराशिव हे 15.20 नहदुर्ग येथील बस स्टॅण्डचे बाजूला आडोशाला बसुन कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 1,185 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये नळदुर्ग पो ठाणे येथे स्वतंत्र 3 गुन्हे नोंदवले आहेत.
भुम पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान भुम पोलीसांनी दि.21.11.2023 रोजी 16.20 वा. सु. भुम पो. ठा. गराडा गल्ली भुम सोमरील बाजूच्या टपरीवर भुम येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे 1)आयाज अब्दुल पठाण, वय 20 वर्षे, रा. गराडा गल्ली, भुम जि. धाराशिव हे 16.20 गराडा गल्ली भुम सोमरील बाजूच्या टपरीवर भुम येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 850 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये भुम पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
“रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा नोंद.”
मुरुम पोलीस ठाणे : आरोपी नामे-1)आनंद भिमराव बनसोडे, वय 41 वर्षे, रा. जेवळी, ता. लोहारा जि. धाराशिव यांनी दि.21.11.2023 रोजी 12.45 वा. सु. आपल्या ताब्यातील ॲपे रिक्षा क्र एमएच 25 एन 624 हा आष्टामोड येथील जेवळी जाणारे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना मुरुम पोलीसांना मिळून आला. तसेच 2)बालाजी नामदेव चव्हाण, वय 35 वर्षे, रा. जेवळी, ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.21.11.2023 रोजी 13.10 वा. सु.आपल्या ताब्यातील ॲपेरिक्षा क्र एमएच 25 एम 1275 हा आष्टामोड येथील जेवळी जाणारे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना मुरुम पोलीसांना मिळून आला. 3)विठ्ठल श्रीरंग डावरे, वय 53 वर्षे, रा. दस्तापूर ता. लोहारा जि. धाराशिव यांनी दि.21.11.2023 रोजी 14.00 वा. सु.आपल्या ताब्यातील ॲपेरिक्षा क्र एमएच 25 एम 1074 हा आष्टामोड येथील जेवळी जाणारे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना मुरुम पोलीसांना मिळून आला. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द भा.द.स. कलम 283 अन्वये कळंब पो.ठा. येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
लोहारा पोलीस ठाणे : आरोपी नामे-1)अनंत भिमराव बनसोडे, वय 41 वर्षे, रा. जेवळी दक्षिण, ता. लोहारा जि. धाराशिव यांनी दि.21.11.2023 रोजी 18.15 वा. सु. आपल्या ताब्यातील वाहन हे जेवळी बाजार चौक येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना लोहारा पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भा.द.स. कलम 283 अन्वये लोहारा पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.
“ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
येरमाळा पोलीस ठाणे : फिर्यादी नामे- मोहम्मद नबीसाहेब मोहम्मद उस्मानशाहा भंगीवाले, वय 45 वर्षे, रा. ओतगी, ता. हुमनाबाद जि. बिदर हे हैद्राबाद येथुन बीड येथे ट्रक मध्ये मिनी कोलम राईस भरुन घेवून जात असताना दि.20.11.2023 रोजी 22.00 वा. सु. तेरखेडा शिवारातील लक्ष्मी पारधी पिडी एनएच 52 रोडवर अज्ञात व्यक्तीने त्यांचे ट्रक मधील अंदाजे 42,176 ₹ किंमतीचे 32 मिनी कोलम राईसचे कट्टे ट्रकवर पाठीमागून चढून ताडपत्री फाडून चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- मोहम्मद नबीसाहेब भंगीवाले यांनी दि.21.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“ मारहाण.”
मुरुम पोलीस ठाणे :आरोपी नामे- 1)अभिजीत अनिल आडे, 2) सुमित नेताजी राठोड,3) रवि इंद्रजित उर्फ युवराज राठोड, 4) महेश लक्ष्मण राठोड, 5) अमिताजी राठोड सर्व रा. बेळंब तांडा जि. धाराशिव यांनी दि. 19.11.2023 रोजी 17.30 वा. सु. बेळंब तांडा येथील सेवालाल महाराज मंदीराचे पाठीमागे रोडवर फिर्यादी नामे- अशोक मानु राठोड, वय 38 वर्षे, रा. बेळंब तांडा जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी मागील भांडणाचे कारणावरुन शिवीगाळ करुन मारहाण करीत असताना फिर्यादीची पत्नी, मुलगर ओमकार, भाच्ची झिमाबाई हे भांडणसोडवण्यास आले असता नमुद आरोपीने त्यांनाही शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने, लोखंडी सळईने माराहण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- अशोक राठोड यांनी दि.21.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
लोहारा पोलीस ठाणे :आरोपी नामे- 1) बाळासाहेब झुंबर सोमवंशी,2 ) आबासाहेब पाटील, रा. आरणी, ता. लोहारा 3) दयानंद जाधव जि. धाराशिव यांनी दि.11.10.2023 रोजी 00.00 ते 00.15 वा. सु. कानेगाव ते आरणी जाणारे रोडवर आरणी येथे फिर्यादी नामे-सदाशिव बळी गिरी, वय 39 वर्षे, रा. आरणी ता. लोहारा जि. धाराशिव यांचे घरासमोर नमुद आरोपींनी गोंधळ घालत असताना फिर्यादीने नमुद आरोपीस विचारले की तुम्ही आमचे घरासमोर रात्रभर गोंधळ का घालता या कारणावरुन नुमद आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने डाव्या मनगटावार मारुन गंभीर जखमी करुन मनगट फ्रॅक्चर केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- सदाशिव गिरी यांनी दि.21.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहारा पो. ठाणे येथे कलम 325,324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“ रस्ता अपघात.”
कळंब पोलीस ठाणे : मयत नामे-कार्तिक ज्ञानेश्वर गरड, वय 7 वर्षे, रा. तळेगाव दाभाडे, ता. जि. पुणे हा. दि.15.11.2023 रोजी 05.30 वा. सु. सुतार वस्तीजवह पिंपळगाव डोळा, ता.कळंब जि. धाराशिव हा रस्ता ओलांडत असताना मारुती सुझुकी इको वाहन क्र. एमएच 03 बीएस 2647 च्या चालकाने त्याचे ताब्यातील कार ही भरधाव वेगावत निष्काळजीपणे चालवुन कार्तिक गरड यास डाव्या बाजूने धडक दिली. या आपघातात कार्तिक गरड हा गंभीर जखमी होवून मयत झाला. अशा मजकुराच्या फिर्यादी शिवाजी भारत उंदरे, वय 40 वर्षे, रा. पिंपळगाव डोळा, ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.21.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 304 (अ) सह मोवाका 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
शिराढोण पोलीस ठाणे : फिर्यादी नामे- यशपाल मनोज वाघमारे, वय 33 वर्षे, रा. देवधानोरा ता. कळंब जि. धाराशिव व सोबत त्यांचे भावजी मयत नामे-दिपक मरीबा अंकुशराव हे दोघे दि. 19.11.2023 रोजी 14.00 वा. सु. कळंब ते ढोकी रोडवरुन मोटरसायकल क्र एमएच 25 एपी 9776 वर बसून जात होते. दरम्यान मारुती वॅगनर गाडी क्र एमएच 25 एडब्ल्यु 6238 च्या चालकाने त्याचे ताब्यातील कार ही भरधाव वेगावत निष्काळजीपणे चालवुन यशपाल वाघमारे यांचे मोटरसायकलला धडक दिली. या आपघातात दिपक अकुंशराव हे गंभीर जखमी होवून मयत झाले. तर यशपाल वाघमारे हा गंभीर जखमी झाला. अशा मजकुराच्या यशपाल वाघमारे यांनी दि.21.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह मोवाका 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
ढोकी पोलीस ठाणे : मयत नामे-मधुकर किसन लाकाळ, वय 65 वर्षे, रा. पळसप ता.जि. धाराशिव हे दि. 17.11.2023 रोजी 10.30 वा. सु. पळसप पाटी येथे उभे असताना ट्रॅकर हेड क्र एमएच 25 एएल 3393 च्या चालक नामे- शुभम विठ्ठल जाधव रा. गोरेवाडी, ता.जि. धाराशिव यांनी त्याचे ताब्यातील ट्रॅक्टर हा भरधाव वेगावत निष्काळजीपणे चालवुन मधुकर लाकाळ यांना धडक दिली. या आपघातात मधुकर लाकाळ हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी- सुधीर मधुकर लाकाळ, रा. पळसप ता. जि. धाराशिव यांनी दि.21.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह मोवाका 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
ढोकी पोलीस ठाणे : आरोपी नामे- उमेश दगडू सावंत, वय 30 वर्षे, सोबत त्यांची आई मयत नामे- लता दगडू सावंत, वय 58 वर्षे, रा. जागजी ता. जि. धाराशिव हे दोघे दि. 13.11.2023 रोजी 10.45 वा. सु. भिकारसोराळा चौकातील गतिरोधक रोडवरुन मोटरसायकल क्र एमएच 25 एवाय वरुन जात होते. दरम्यान उमेश सावंत यांनी त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही गतीरोधक वरुन भरधाव वेगावत निष्काळजीपणे चालवुन मयत लता सावंत या मोटरसायकलवरुन खाली पडून गंभीर जखमी होवून मयत झाल्या. अशा मजकुराच्या फिर्यादी- दगडु त्रिंबक सावंत, वय 60 वर्षे, रा. जागजी ता. जि. धाराशिव यांनी दि.21.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 338, 304 (अ) सह मोवाका 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
ढोकी पोलीस ठाणे : मयत नामे-बाळासाहेब बाबु मोरे, वय 45 वर्षे, रा. जयभवानी नगर ढोकी ता.जि. धाराशिव हे दि. 11.11.2023 रोजी 16.30 वा. सु. तउवळा येथील स्मशान भुमी जवळुन मोटरसायकल क्र एमएच 25 डब्ल्यु 3869 वरुन जात होते. दरम्यान मोटरसायकल क्र एमएच 25 एएस 6625 चा चालक नामे- धिरज बाहासाहेब घुटे यांनी यांनी त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही भरधाव वेगावत निष्काळजीपणे चालवुन चुकिच्या दिशेने येवून बाळासाहेब मोरे यांचे मोटरसायकलला धडक दिली. या आपघातात बाळासाहेब मोरे हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी- संजय बाबुराव मोरे, वय 42 वर्षे, रा. जयभवानी नगर ढोकी ता. जि. धाराशिव यांनी दि.21.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह मोवाका 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी