August 9, 2025

निष्ठेचे फळ

  • “मानवी मुल्यांसाठी योगदान देणाऱ्या सर्व महापुरुषांचे विचार हे उदयास येणाऱ्या नवपिढीला व तरुण पिढीला समजले पाहिजे म्हणून माझे आदर्श वडील तथा सा.साक्षी पावनज्योतचे कर्तव्यदक्ष संपादक मा.सुभाष दशरथ घोडके यांनी सन १९८८ पासून दलित सेना,बहुजन सेना,प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्था, राष्ट्रवादी काँग्रेस,स्वराज इंडिया अशा विविध चळवळीत सक्रियपणे कृतिशील सामाजिक कार्य करून विचारांचा जागर तेवत ठेवण्याचे कार्य आजच्या आधुनिक काळातही चोखपणे करत आहेत.
    विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या म्हणण्यानुसार सामाजिक चळवळीला वृत्तपत्रांची साथ असली तर आपले स्वतःचे विचार,स्वतःकरत असलेले कार्य व समाजातील दुर्लक्षित बाब,गरज,समस्या ह्या शासन प्रशासनाच्या पेपरच्या माध्यमातून निदर्शनास आणून देण्यात मदत होते. एखाद्या गोष्टींचा प्रचार -प्रसार करण्यासाठी वृत्तपत्र हे मुख्य भूमिका बजावत असतात.
    माझे पप्पा सुभाष घोडके यांनी सन २००१ पासून सा.परिवर्तन शक्ती,सा.साक्षी बहुजनांचे आश्रू पूसणारे व प्रबुद्ध साक्षी हे तीन टायटल नाव असलेले वृत्तपत्रांची वेळेवर छपाई होत नसल्याने शासन दरबारी आर्थिक मदतीसाठी पात्र ठरू शकला नाही.
    ह्या काळातही माझ्या पप्पांची लेखणी महापुरुषांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी अनेक विविध विषयांवरपथनाटीका,पुस्तके,कादंबरी,जीवनसंग्राम,माहितीपट,अग्रलेख ही प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्थेच्या प्रकाशन समिती व अनेक ठिकाणी कृतिशील सामाजिक कार्य केलेली आहेत.
    सन १९७१ साली शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींनी बहुजनांच्या मुलांमध्ये शैक्षणिक जाणीव जागृती होऊन त्यांनी मराठवाड्यात स्थापन केलेल्या विद्यार्थ्यांच्या उपक्रमाच्या बातम्या ह्या समाजमाध्यमावर पोहचवून त्या विद्यार्थ्यांच्या कार्याला दाद मिळून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सा.बोबाबोंब, सा.पावनज्योतची निर्मिती केली.नंतर शैक्षणिक कार्यांच्या बिझी शेड्यूलमुळे पेपरचे अस्तित्व टिकवू शकले नाहीत.
    ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोक मोहेकर साहेबांच्या मार्गदर्शनात मोहेकर उद्योग समूहांचे कर्तव्यदक्ष अध्यक्ष मा.हनुमंत (तात्या) मडके यांच्या प्रेरणेने सन १५ ऑगस्ट २०१६ रोजी माझे पप्पा सुभाष घोडके यांनी बहुजनांच्या न्याय हक्कांसाठी व शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी सा.साक्षी पावनज्योतची निर्मिती केली.
    आजच्या घडीला सा.साक्षी पावनज्योतचे आठवे वर्ष चालू आहेत.ह्या आठ वर्षात अग्रलेख,साहित्यिकांचे लेख,कविता,अनेक समस्यांना व शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींनी स्थापन केलेल्या मराठवाड्यातील शाळा,महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या उपक्रमांची बातम्याद्वारे प्रसिद्धी देवून सा.साक्षी पावनज्योत हे शासकीय यादीवरील नंबर-१ चे वृत्तपत्र झाले आहे.
    ऑल इंडिया संपादक संघाच्या धाराशिव जिल्हा अध्यक्ष पदी सा.साक्षी पावनज्योतचे कर्तव्यदक्ष संपादक माझे पप्पा सुभाष घोडके यांची निवड ही संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष करण बौद्ध यांनी केली आहे.
    यानिमित्ताने त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस मंगलमय सदिच्छा….

  • – प्रा.अविनाश घोडके
    कार्यकारी संपादक
    सा.साक्षी पावनज्योत
error: Content is protected !!