पारा – ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक नवनाथ सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १७ जुलै २०२५ रोजी जय भवानी विद्यालय,पारा येथे ज्ञान प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर यांच्या प्रतिमेस मुख्याध्यापक नवनाथ सूर्यवंशी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये सहाय्यक शिक्षक भराटे संदीप,श्रीमती मेटे शितल,वाघमारे सतीश,मुरकुटे दीपक,माळी विकास,बांगर अमोल,मुळे दीपक,सोलंकर शहाजी,गवळी अमोल,डंबरे तुषार व शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या भक्तिभावाने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शांत,शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडले.ज्ञान प्रसारक मंडळाच्या कार्याला आणि शिक्षण महर्षींच्या स्मृतीस मानाचा मुजरा देण्याचा मनोभाव सर्वांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.
More Stories
जय भवानी विद्यालय,पारा येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन
जय भवानी विद्यालय पारा येथे डॉ.अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी
जय भवानी विद्यालय पारा येथे गरजू विद्यार्थ्यांसाठी वह्यांचे वाटप उपक्रम