धाराशिव (जिमाका)- राज्याच्या ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवकांसह पशुपालक व शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करुन देत,त्यांना शाश्वत अर्थार्जनाचा पर्याय उपलब्ध करुन देण्याच्या पशुसंवर्धन विभागाने विविध योजना व उपक्रमांद्वारे ग्रामीण महाराष्ट्राचे अर्थचक्र गतिमान ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. विविध योजना व उपक्रमांच्या माध्यमांतून ग्रामीण भागातील पशुपालक,शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करुन देण्यासाठी कटिबध्द असलेल्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने वैयक्तीक लाभाच्या योजनांतर्गत प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनेमध्ये गेली चार वर्षे ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविणे व लाभार्थी निवड करण्याची पध्दत सुरु करण्यात आली आहे. सन २०२१-२२ पासून जिल्हास्तरीय विविध योजनांसाठी संगणक प्रणाली लागू करण्यात आली आहे.यामध्ये शासनाने एखाद्या योजनेकरीता अर्ज केल्यानंतर त्यासाठी दरवर्षी पुन्हा अर्ज करावा लागू नये,यासाठी तयार केलेली प्रतिक्षा यादी सन २०२१-२२ पासून पुढील ५ वर्षांपर्यंत म्हणजे सन २०२५-२६ पर्यंत लागू ठेवण्याची सोय केली आहे.यामुळे अर्ज केलेल्या पशुपालकांना लाभ मिळण्याची शक्यता वाढली आहे.त्यांना प्रतिक्षा यादीतील क्रमांकानुसार अंदाजे केंव्हा लाभ मिळेल,हे कळू शकल्यामुळे लाभार्थी हिस्सा भरणे किंवा इतर बाबींकरीता नियोजन करता येणे शक्य होणार आहे. त्यानुसार नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेंतर्गत दुधाळ गाई-म्हशीचे गट वाटप करणे, शेळी-मेंढी गट वाटप करणे,१००० मांसल कुक्कुट पक्ष्यांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे,१०० कुक्कुट पिलांचे वाटप व २५+३ तलंगा गट वाटप या योजनांसाठी ऑनलाईन पध्दतीने लाभार्थी निवड प्रक्रिया सन २०२३-२४ या वर्षात राबविली जाणार आहे.पशुपालकांना डेअरी,पोल्ट्री किंवा शेळीपालन यापैकी ज्या बाबींमध्ये अर्ज करावयाचा आहे. त्यांची निवड करण्याची सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे.राज्यातील पशुपालक,शेतकरी बांधव, सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती व महिलांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज दाखल करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात येत आहे. या योजनांची संपूर्ण माहिती तसेच अर्ज करण्याची पध्दती याबाबतचा संपूर्ण तपशील http://ah.mahabms.com या संकेतस्थळावर तसेच अँड्राईड मोबाईच्या गुगल प्ले स्टोअरवरील AH-MAHARMS या ॲपवर उपलब्ध आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीनेच स्वीकारले जातील. या संगणक प्रणालीमध्ये अर्ज भरणे अत्यंत सुलभ करण्यात आले आहे. अर्जामधील माहिती कमीत-कमी टाईप करावी लागेल आणि बहुतांशी माहितीबाबत पर्याय निवडण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे पशुपालकांनी अर्ज भरण्याकरीता स्वत:च्या मोबाईल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठविण्यात येणार असल्याने कोणत्याही परिस्थितीत अर्जदाराने योजनेंतर्गत आपला मोबाईल क्रमांक बदलू नये. या योजनेबाबत अधिक माहितीसाठी १९६२ किंवा १८००-२३३-०४१८ या टोल फ्री क्रमांकावर किंवा तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार),पंचायत समिती,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अथवा जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय,जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय,तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क साधावा.असे आवाहन पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात येत
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला