धाराशिव (जिमाका) – भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे १२५ वे जयंती वर्ष देशभरात मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येत असून,त्यानिमित्ताने केंद्र शासनाने सन २०१५ मध्ये स्टँडअप इंडिया योजना लागू केली.या योजनेत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील उद्योजकांना विशेष लाभ देण्यात येत आहेत. या योजनेंतर्गत पात्र नवउद्योजकांनी आपला १० टक्के स्वहिस्सा भरल्यानंतर,बँकेकडून कर्जाच्या ७५ टक्के रकमेपर्यंत मंजुरी मिळाल्यानंतर उर्वरित १५ टक्के रक्कम फ्रंट एंड सबसिडी म्हणून राज्य शासनाकडून देण्यात येते.ही सवलत अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील पात्र लाभार्थ्यांना मिळणार आहे. अनुदानासाठी इच्छुक लाभार्थ्यांनी समाज कल्याण आयुक्त,महाराष्ट्र राज्य,पुणे यांच्याकडे विहित नमुन्यातील मागणीपत्र सादर करावे. त्यासोबत उद्योग आधार नोंदणी प्रमाणपत्र,जात प्रमाणपत्र व बँकेचे कर्ज मंजुरीचे पत्र संलग्न करणे आवश्यक आहे. योजनेच्या अटी पूर्ण करणाऱ्या पात्र नवउद्योजकांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण,धाराशिव यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा,असे आवाहन सहाय्यक आयुक्त सचिन कवले यांनी केले आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला