धाराशिव — जिल्ह्यातील कुक्कुटपालन क्षेत्रात व्यवसायिक संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने, पशुसंवर्धन विभागाअंतर्गत कार्यरत सघन कुक्कुट विकास गट,धाराशिव यांच्या वतीने दिनांक ७ जुलै ते ११ जुलै २०२५ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने “व्यवसायिक पद्धतीने कुक्कुटपालन” या विषयावर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणात सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती, पशुपालक, कृषी व पशुवैद्यकीय शाखेचे विद्यार्थी तसेच कुक्कुटपालनात रुची असलेले विविध घटक यांनी सहभाग नोंदवला.एकूण १३० प्रशिक्षणार्थींनी नोंदणी करून प्रशिक्षणाचा लाभ घेतला. प्रशिक्षणात विविध तज्ज्ञांनी ब्रॉयलर व लेयर संगोपन,देशी कोंबडी पालन,लसीकरण,जैव सुरक्षा उपाय,व्यवसायासाठी आवश्यक परवानग्या तसेच करार पद्धतीचे पालन यासारख्या महत्त्वाच्या बाबींचे सखोल मार्गदर्शन केले. प्रशिक्षणाचा समारोप दि. ११ जुलै २०२५ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. लातूर विभागाचे प्रादेशिक सह आयुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय डॉ.नानासाहेब सोनवणे आणि धाराशिव जिल्ह्याचे जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय डॉ.मनोज घाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वाटप डॉ.सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ.सोनवणे यांनी प्रशिक्षणार्थींना त्यांच्या भावी कुक्कुटपालन व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या तसेच मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ.वैभव पाटील,पशुधन विकास अधिकारी,सघन कुक्कुट विकास गट, धाराशिव यांनी केले.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला