August 9, 2025

“जिद्द,चिकाटी व आत्मविश्वासाच्या जोरावर यश शक्य” – प्रशांत जाधव यांचे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन

  • कळंब (राजेंद्र बारगुले ) – “जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या जोरावर कोणतेही यश प्राप्त करता येते,” असे उद्गार तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर येथील जनसंपर्क अधिकारी प्रशांत जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना काढले.
    भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्था (वेद शैक्षणिक संकुल अंतर्गत) येथे २०२३-२५ या शैक्षणिक सत्रातील प्रशिक्षणार्थ्यांचा निरोप समारंभ गुरुवार,दि. १० जुलै २०२५ रोजी प्राचार्य सतीश मातने यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडला.
  • धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या प्रेरणेतून व प्राचार्य सतिश मातने यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
    कार्यक्रमाची सुरुवात विश्वकर्मा व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली.यानंतर विविध ट्रेडमधील आदर्श प्रशिक्षणार्थ्यांचा ट्रॉफी,प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
  • सन्मानित प्रशिक्षणार्थी –
    इलेक्ट्रिशियन ट्रेड – प्रणव पाचभाई,हर्षद मगर,अजय साळुंके,रिहान तांबोळी,सुजल गाडे
  • वायरमन ट्रेड – आशिष बोंदर, चाळक भागवत,नागटिळक रोहित,साळुंखे अजय,पवार सार्थक
  • वेल्डर ट्रेड – रितेश शिंदे
  • उत्कृष्ट प्रोजेक्ट सादरीकरणाबद्दल प्रथमेश आंबिरकर व तेजस भराडे यांना विशेष सन्मान देण्यात आला.
    या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून व्ही.एस.फार्मसी कॉलेज,पुणे येथील प्राचार्य डॉ.विजयकुमार काळे,जनसंपर्क अधिकारी प्रशांत जाधव,आणि प्राचार्य सतीश मातने यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व यशस्वी भवितव्याची प्रेरणा दिली.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निर्देशक अविनाश म्हेत्रे यांनी केले. प्रास्ताविक प्राचार्य सुरज भांडे,तर आभार प्रदर्शन राजकुमार शिंदे यांनी केले.
    या कार्यक्रमाला प्रा.श्रीकांत पवार, प्रा.सुकेशनी गव्हाणे,प्रा.मोहिनी शिंदे,प्रा.अविनाश घोडके (सांस्कृतिक विभाग प्रमुख), निर्देशक अर्जुन मंडाळे,निदेशिका कोमल मगर,दिक्षा गायकवाड, विनोद कसबे,सौ.सोनाली ढमाले आदी मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!