कळंब – “भेटी लागे जीवा, आतुरले मन” अशा भक्तिभावाने पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी कळंब येथील ‘फ्रेंड्स फोरेवर’ या वर्गमित्रांच्या ग्रुपने एक अद्वितीय आणि प्रेरणादायी सामाजिक उपक्रम उभारला आहे. गेल्या आठवड्यापासून या ग्रुपने पंढरीकडे विदर्भ मराठवाड्यातून निघालेल्या वारकऱ्यांसाठी दहा दिवसांचे मोफत अन्नदान छत्र, औषधोपचार शिबिर आणि राहण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. 130 जुन्या वर्गमित्रांनी एकत्र येत केवळ गेट-टुगेदरपुरती मर्यादा न ठेवता, सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत हा उपक्रम सुरू केला आहे. या ग्रुपने आजवर कळंब शहरात वृक्षारोपण,क्रीडा स्पर्धांसाठी साहाय्य,कृषी प्रदर्शनाचे आयोजन अशा अनेक उपक्रमांमधून आपली निस्वार्थ वृत्ती व सेवाभाव सिद्ध केला आहे. विदर्भ-मराठवाड्यातून पंढरीकडे मार्गस्थ होणाऱ्या सुमारे २५० हून अधिक दिंड्यांना रस्त्यात अन्न-पाण्याची व औषधांची अडचण भासू नये यासाठी ‘फ्रेंड्स फोरेवर’ ग्रुपने पुढाकार घेतला आहे. राधेश्याम मंगल कार्यालयात वारकऱ्यांच्या राहण्याचीही मोफत व्यवस्था करण्यात आली असून, ग्रुपचे सर्व सदस्य आणि त्यांच्या कुटुंबीयांनी यात सक्रिय सहभाग घेतला आहे. या उपक्रमात तरुणाईची सकारात्मक ऊर्जा, समर्पण, आणि समाजसेवेबद्दलची बांधिलकी स्पष्टपणे जाणवते. त्यामुळे अनेक दिंडी प्रमुख, वारकरी आणि नागरिकांनी या ग्रुपच्या कार्याची दखल घेत कौतुकाची थाप दिली आहे. ‘फ्रेंड्स फोरेवर’ ग्रुपच्या पुढाकारामुळे इतर तरुणांसाठीही प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. अभिजीत लोंढे , राहुलजी कवडे ,भैय्यासाहेब खंडागळे , अश्रुबा कस्पटे , राजाभाऊनागटिळक ,गोपाळ उबाळे , दिनेश अष्टेकर,सतीश घाडगे,संतोष लांडगे,बाबा पवार,बजरंग घुले , उमेश बोंदर,गोविंद खंडेलवाल , गोविंद रणदिवे,प्रा.जगदीश गवळी, विनोद दळवे,परमेश्वर मोरे,गजेंद्र पुरी ,शशिकांत बारटक्के,शैलेश गुरव,डॉ.भगवंत जाधवर,डॉ. सुशील ढेंगळे ,डॉ.सुधीर आवटे, डॉ.गिरीश कुलकर्णी ,डॉ.अशोक माळी,ज्ञानेश्वर डाळे,शरद खंदारे , निखिल भडंगे ,अशोक मानोमोडे, सार्थक कवडे,नवनाथ चोंदे,संदीप शेंडगे ,राजपाल देशमुख आदिनी परिश्रम घेतले.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले