धाराशिव (जिमाका)- अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत म्हणून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागमार्फत विविध शिष्यवृत्ती योजनांचा लाभ ऑनलाइन पद्धतीने दिला जातो.त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता शिष्यवृत्ती अर्ज १ जुलै २०२५ पासून भरावयास सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती,शिक्षण व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना,राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती,तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी निर्वाह भत्ता या योजनांचा लाभ घेता येणार आहे. अर्ज प्रक्रिया ही अर्ज संकेतस्थळ: http://mahadbtmahit.gov.in यावर अर्ज भरल्यानंतर त्याची हार्ड कॉपी संबंधित महाविद्यालयात जमा करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी ऑनलाइन प्राप्त अर्ज शासनाच्या निकषांनुसार वेळेत छाननी करून, पात्र अर्ज समाज कल्याण कार्यालय, धाराशिव यांच्याकडे तात्काळ अग्रेषित करावेत. एकही पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू नये,यासाठी विशेष दक्षता घेण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याणचे सहायक आयुक्त सचिन कवले यांनी केले आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला