August 8, 2025

राजश्री शाहू महाराज राज्यस्तरीय पुरस्काराने कोमल टोपे सन्मानित

  • शिराढोण – कळंब तालुक्यातील लोहटा (पूर्व) या गावची कन्या कोमल बबन टोपे विद्यापीठात डॉक्टर ऑफ फिलॉसॉफरच शिक्षण घेत आहे.अत्यंत गरीब कुटुंबात राहणारी मुलगी आपल्या परिस्थितीला न घाबरतां तिने आई वडिल आणि समाजच नाव केलं आहे.तीने प्राथमिक शिक्षण लोहटा ( पूर्व) येथे जिल्हा परिषद शाळेत केले व माध्यमिक शिक्षण हे धरणग्रस्त विद्यालय येथे घेतले. शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब येथे पदवी पूर्ण केली.सोबतच एन सी सी मध्ये बी व सी पूर्ण केले.पुढील शिक्षणासाठी छत्रपती संभाजीनगर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ मराठी विभागात मास्टर ऑफ आर्ट मध्ये प्रवेश घेतला सोबत कमवा आणि शिका योजनेत काम करून आपला खर्च भागवला. शिक्षण घेत असताना आलेला अनुभव तिच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला.त्यानंतर तिने मास्टर ऑफ फिलॉसॉफी करत असतानाच तीला बार्टी संस्थेद्वारे दिली जाणारी फेलोशिप मंजूर झाली.एम फिल चे मार्गदर्शक म्हणून डॉ.प्रो.रमेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन पूर्ण केले व मास्टर ऑफ फिलॉसॉफर ही पदवी मिळवली. विद्यापीठाला अनमोल असा शोध प्रबंध सादर केला.
    कळंब तालुक्यातील लोकोक्तींचा अभ्यास ( उखाणे, म्हणी, वाक्यप्रचार यांच्या संदर्भात) संशोधन पूर्ण केले आहे. या आधारावर तील राजर्षी छत्रपती शाहू महाराज राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला तो पुरस्कार डॉ.जयसिंगराव गायकवाड (माजी केंद्रीय कोळसा व खान मंत्री भारत सरकार) यांच्या हस्ते देण्यात आला.पुढील संशोधन कार्य सुरूच ठेवत शिक्षणाचा खडतर प्रवास करावा लागला लोकांकडे लक्ष न देता जिद्द आणि चिकाटीने स्वतःच भविष्य घडविले.पी.एच-डी संशोधनाचा विषय विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या जिवनावरील साहित्यलेखन एक चिकित्सक अभ्यास आहे.
error: Content is protected !!