August 8, 2025

आष्टा येथे छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

  • गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व मुख्याध्यापकांचा वाढदिवस साजरा
  • आष्टा – विद्यामंदिर हायस्कूल, आष्टा येथे आज दिनांक 26 जून 2025 रोजी लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक शशिकांत मांजरे यांनी प्रभावीपणे पार पाडले.
    कार्यक्रमानंतर शैक्षणिक वर्ष 2024-2025 मध्ये एस.एस.सी. (दहावी) बोर्ड परीक्षेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला.
    या प्रसंगी शालेय समितीचे अध्यक्ष चंद्रकांत (आबा) काकडे, तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक आनंद रामटेके यांचा वाढदिवस देखील आनंदात साजरा करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी त्यांना शुभेच्छांचा वर्षाव केला.

  • कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांमध्ये तानाजीराव गिलबिले,विक्रम गिलबिले,सतीश महाराज,माजी सरपंच शिवाजी माळी,शेषराव जाधव,नितीन वाघमारे,अनेक पालकगण, तसेच शाळेतील सर्व कर्मचारी व शिक्षकवृंद उपस्थित होते.
    कार्यक्रमात सहभागी शिक्षकांमध्ये
    शशिकांत मांजरे, नामदेव अनंत्रे,संघपाल सोनकांबळे,
    श्रीमंती निर्मला सावंत,सुजितकुमार जाधव,बबन यादव यांचा उल्लेखनीय सहभाग होता.
  • नामदेव अनंत्रे यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करून समारोप केला.
    संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
error: Content is protected !!