कळंब (माधवसिंग राजपूत ) – भरघोस व चांगल्या पिक,उत्पादनासाठी जमीन,पाणी हवा हे घटक महत्त्वाचे असून शेतकऱ्यांनी हवामानाचा अभ्यास करून अनुकूल हवामानात येणारी पिके घ्यावीत याचबरोबर शेतकऱ्यांनी फळपीक घेणे गरजेचे आहे.ज्या शेतकऱ्यांनी फळबाग शेती केली आहे.त्यांची शेती फायदेशीर ठरली आहे असे विचार कळंब तालुका कृषी अधिकारी भागवत सरडे यांनी कृषी दिन कार्यक्रमात बोलत असताना व्यक्त केले . १ जुलै महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक यांचा जन्मदिन कृषी दिन म्हणून साजरा केला जातो.या कार्यक्रमाच्या मंचावर किरण निंबाळकर कृषी विस्तार अधिकारी पंचायत समिती कळंब,वैभव तांबारे कृषी मंडल अधिकारी,ए. एन.काळे कृषी सहाय्यक यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात पुढे बोलताना तालुका कृषी अधिकारी भागवत सरडे यांनी सेंद्रिय खताच्या वापरामुळे जमीन सुपीक बनते व तिचे आरोग्य चांगले राहते असे सांगितले व जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार यांच्या संकल्पनेतून धाराशिव जिल्ह्यात ” ग्रीन धाराशिव ” वृक्षारोपणाचा महत्त्वकांक्षी प्रकल्प राबविण्यात असून यासाठी खुली,संस्था, कार्यालयाच्या पडीक व खुल्या जागेत २०२५ पावसाळ्यात ५० लाख झाडे व एकाच दिवशी १५ लाख झाडे लावण्यात येणार असल्याचे सांगून या कार्यक्रमात सहभागी होण्याचे तालुका कृषी अधिकारी भागवत सरडे यांनी आवाहन केले.या कार्यक्रमात वैभव तांबारे,मंडल कृषी अधिकारी यांनी आपले विचार व्यक्त केले तसेच एकनाथ जाहीर ऑस्कर सिड प्रतिनिधी यांनी शेतीमध्ये जैविक,सेंद्रिय खते,गांडूळ खत वापरावे यामुळे उत्पादन वाढते तसेच रसायनिक खताच्या वापरामुळे व याच्या परिणामामुळे माणसाच्या आरोग्यावर घातक परिणाम होत असून वेगवेगळे आजार वाढत आहेत यापासून मुक्ती मिळवण्यासाठी ,तंदुरुस्त राहण्यासाठी सेंद्रिय शेती विषयी सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमात कळंब तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने शेतकऱ्यांना विविध योजना विषयी प्रोजेक्टर द्वारे माहिती दिली.या प्रसंगी कळंब तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक नंदकुमार कदम,श्रीमती एम.के.फाटक,ऑपरेटर प्रसाद काळे यांची उपस्थिती होती.
More Stories
डिकसळ येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन