धाराशिव – येथील माजी नगरसेवक पृथ्वीराज चिलवंत यांचा मागासवर्गीय सेवानिवृत्त कर्मचारी संघ शाखा धाराशिवच्या वतीने स्मृती बुध्दविहार धाराशिव येथे वाढदिवस साजरा करण्यात आला.सुरुवातीला तथागत बुध्द व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून पुष्पहार घालून वंदन करण्यात आले. त्यानंतर त्रिशरण,पंचशील ग्रहण करण्यात आले.यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण (भाऊ) बनसोडे व मान्यवरांच्या हस्ते पृथ्वीराज चिलवंत यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त व्ही.एस. गायकवाड यांनी चिलवंत यांना ए.पी.जे.अब्दूल कलम यांचे चरित्र भेट दिले.यावेळी सचिन दिलपाक यांनी मनोगत व्यक्त करताना आज आमच्या समोर पृथ्वीराज चिलवंत यांच्या कार्याचा आदेश आहे,त्यांचा आदर्श समोर ठेवून आम्ही सामाजिक कार्य करीत आहोत.यावेळी स्वराज जानराव व सचिन दिलपाक यांनी शालेय विद्यार्थ्यांना वाटपासाठी रजिस्टर भेट दिले.कार्यक्रमाचे संयोजन संघटनेचे सुनिल बनसोडे यांनी केले. मनोगत व्यक्त करताना पृथ्वीराज चिलवंत म्हणाले की,मी,बुध्द आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार जगतो आहे,जनतेने जे मला आजपर्यंत प्रेम दिले, आशिर्वाद दिले.त्यामुळेच मी आजपर्यंत कार्य करत राहिलो आहे.या वाढदिवसानिमित्त केलेल्या सत्कार सोहळयामुळे माझी जबाबदारी आणखीन वाढली आहे.यापुढेही मी सतत सामाजिक कार्य करीत राहीन अशा भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमास यु.व्ही.माने,स्वराज जानराव,सवई,अशोक बनसोडे, श्रीकांत चिलवंत,दिलीप वाघमारे, बाळासाहेब माने,राजाभाऊ बनसोडे इत्यादी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार कवी प्रभाकर बनसोडे यांनी मांडले.
More Stories
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक
दुखवट्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा मतदान दिवस बदलला;आता ७ फेब्रुवारीला मतदान