August 9, 2025

छत्रपती शिवाजी महाविद्यालयात रासेयो दिन साजरा

कळंब – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संलग्नित छत्रपती शिवाजी महाविद्यालय,कळंब व आयक्युएसी/रासेयो विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात रासेयो स्थापना दिवसाच्या निमित्त सोमवार दि.२५ सप्टेंबर २०२३ रोजी ‘राष्ट्रीय सेवा योजना दिन’ निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमाना एनएसएस कार्यक्रमाधिकारी प्रा.ज्योतीराम जाधव व प्रा.मनिषा कळसकर यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कार्यक्रमाधिकारी प्रा.ज्योतीराम जाधव यांनी रासेयोनेच्या स्वयंसेवकांना ‘राष्ट्रीय सेवा योजना’ दिनाचे महत्त्व पटवून दिले.तसेच देशाचा विकास साधण्यासाठी महाविद्यालयीन स्तरावर युवकांमध्ये नवचेतना निर्माण व्हाव. यासाठी रासेयो विभागा मार्फत वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.रासेयो दिना निमित्त श्रमदानाच्या माध्यमातून सर्व स्वंयसेवक व कर्मचारी यानी मिळून महाविद्यालयातील परिसर स्वच्छ केला.या कार्यक्रमाचे आभार सौ.मनिषा कळसकर यांनी मानले.या वेळी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.

error: Content is protected !!