कळंब – शहरातील छत्रपती संभाजी महाराज नगरातील डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वेद शैक्षणिक संकुलातील भैरवनाथ अध्यापक विद्यालय व भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील वर्कशॉपमध्ये गणेशोत्सवानिमित्त भैरवनाथ गणेश मंडळात गणेशाची आरतीचा मान भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे प्रा.श्रीकांत पवार यांना देण्यात आला. यावर्षी गणेशोत्सवाची आय.टी.आय मधील पहिल्या वर्षातील आषिश बोंदर,संकेत सोमासे,भागवत चाळक,सुजल लोखंडे शुभम लोंढे,सुजित बोंदर, भाऊसाहेब घाडगे आदी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला होता. याप्रसंगी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.अविनाश घोडके, प्रा.मोहिनी शिंदे,भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सूरज भांडे,क्रीडाशिक्षक विनोद जाधव,निदेशक सागर पालके,निदेशक अविनाश म्हेत्रे,निदेशिका कोमल मगर,लिपिक आदित्य गायकवाड,विनोद कसबे आदींची उपस्थिती होती.
More Stories
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन