कळंब – तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाथर्डी येथे 21 जून शनिवार रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी योग दिनाबद्दल मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड यांनी विस्तृत माहिती सांगितली. योगशिक्षक धनंजय गव्हाणे यांनी विविध योगाचे प्रकार कृतीसह विद्यार्थ्यांसमोर सादर करून विद्यार्थ्याकडून करून घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने योगाचे प्रकार केले. तसेच काही विद्यार्थ्यांनी स्वतः समोर येऊन योगाचे प्रकार सादर केले.याप्रसंगी सहशिक्षिका सरोजिनी पोते, मनीषा पवार, सुरेखा भावले यांनी विद्यार्थ्यांना योगाचे धडे दिले. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष अंजली यशवंत जाधव, समुदाय आरोग्य अधिकारी संदेश जोशी उपस्थित होते.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले