August 9, 2026

शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना लातूर येथे अभिवादन

  • लातूर – मराठवाड्यातील ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षण पोहोचविण्याचे स्वप्न उराशी बाळगून ‘ज्ञान दीप लावू जगी’ हे ब्रीदवाक्य घेऊन कार्यरत असलेल्या ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे संस्थापक अध्यक्ष कै.शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना दिनांक १९ जून २०२५ रोजी गुरुवारी लातूर येथील श्री शिवाजी विद्यामंदिर हायस्कूलमध्ये अभिवादन करण्यात आले.
    कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य दिगंबर खामकर यांच्या हस्ते गुरुजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना कृतज्ञतेने अभिवादन करण्यात आले.
    उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत वातावरण अत्यंत भावुक आणि प्रेरणादायी होते.
    यावेळी गुरुजींच्या शिक्षणविषयक संकल्पनांची आणि कार्याची दिशा अधोरेखित करणारा सा.साक्षी पावनज्योत या वृत्तपत्राचा शिक्षण तज्ञ,सचिव डॉ.अशोकराव मोहेकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त प्रसिद्ध झालेल्या या विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले.

  • या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना कार्यकारी संपादक प्रा. अविनाश घोडके यांनी शि.म.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या शैक्षणिक कार्यातील समर्पण, त्याग आणि दृष्टिकोन यावर प्रकाश टाकला.त्यांनी सांगितले की,”गुरुजींच्या कार्यातून हजारो विद्यार्थी घडले,आणि आजही त्यांची शिकवण ‘साक्षी पावनज्योत’च्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचते आहे.”
    याप्रसंगी प्राचार्य दिगंबर खामकर,पर्यवेक्षक श्रीनिवास पांचाळ,सहशिक्षक प्रशांत येरमाळकर,सहशिक्षक देवंद्र भोंडवे, सहशिक्षका मंजुषा काळे,सेवक रामचंद्र केंद्रे आदींची उपस्थिती होती.
    या कार्यक्रमाने उपस्थित प्रत्येकाच्या मनात प्रेरणा निर्माण केली आणि गुरुजींच्या शिक्षणविश्वातील कार्यास विनम्र अभिवादन व्यक्त करण्यात आले.
error: Content is protected !!