विश्वरत्न बोधीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून,त्यांचे विचार अंगीकारून आणि त्यांच्याच मार्गावर चालत सामान्य परिस्थितीतून असामान्य यशाची गाथा लिहिणाऱ्या नेतृत्वाचे नाव म्हणजे विद्रोही नेतृत्व राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांच्या मार्गदर्शनाखाली ऑल इंडिया पॅंथर सेनेचे धाराशिव ग्रामीण जिल्हाध्यक्ष अशोक कसबे.
विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या शिका,संघटित व्हा आणि संघर्ष करा या त्रिसूत्रीला पँथर अशोक कसबे यांनी त्यांच्या जीवनात कृतीत उतरवले. शिक्षण,संघटन आणि सामाजिक संघर्ष यांच्या बळावर त्यांनी स्वतःचे अस्तित्व निर्माण केले. आजही प्रज्ञा सूर्य डॉ. बाबासाहेबांचा संविधानिक विचार, समतेचा संदेश आणि समाजपरिवर्तनाची धग त्यांच्या प्रत्येक कृतीतून अनुभवायला मिळते. अशोक कसबे यांचा प्रवास म्हणजे एक संघर्षाची आणि जिद्दीची कहाणी.कोणतेही पार्श्वभूमी लाभलेली नसतानाही त्यांनी स्वतःला घडवलं,लोकांमध्ये मिसळून त्यांची दुःख जाणून घेतली,आणि लोकांच्या अपेक्षांवर खरे उतरले.त्यांनी मिळवलेलं यश हे केवळ त्यांचं वैयक्तिक यश नसून, ते समाजासाठी उभारलेलं एक आदर्श आहे. अशोक कसबे हे केवळ नेतृत्व करत नाहीत,ते कार्यकर्त्यांमध्येच राहतात.त्यांचा आवाज हा समाजाच्या तळागाळातील लोकांचा आवाज आहे.अन्याय, विषमता,शोषण याविरुद्ध ते सतत सजग असतात. कांतदर्शी बोधिसत्व डॉ.बाबासाहेबांचा संघर्षमय जीवनपट आणि सामाजिक न्यायासाठीचा त्यांचा लढा,याचे प्रतिबिंब त्यांच्या कार्यातून दिसून येते. शिक्षण,युवक विकास,आरोग्य, सामाजिक सलोखा,संविधान जागृती अशा अनेक क्षेत्रांत जिल्हाध्यक्ष अशोक कसबे यांचा सक्रिय सहभाग असतो.त्यांनी नेहमी ‘मी’ पलीकडे जाऊन ‘आपण’ हा दृष्टिकोन ठेवला. म्हणूनच समाजमनात त्यांचं स्थान अढळ आहे.
🎉 वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🎉
आज अशा प्रेरणादायी,सडेतोड आणि जाज्वल्य नेतृत्वाचा आज मंगलमय दिन म्हणजेच त्यांचा वाढदिवस. जिल्हाध्यक्ष अशोक कसबे यांना प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा!
🌼 त्यांच्या पुढील आयुष्यात आरोग्य, यश, शांतता आणि सामाजिक परिवर्तनाची अधिक ताकद लाभो, हीच सदिच्छा.
More Stories
पोलीस कुटुंबातील दोन्ही मुली डॉक्टर;खामसवाडीचा उंचावला मान
मोबाईलच्या अतिरेकाने संवाद हरवला;तरुणाई व्यसनाच्या विळख्यात – विश्वनाथ (अण्णा) तोडकर यांचा इशारा
छत्रपती शिवाजी महाराज चौकात अतिक्रमणावर बुलडोझर;नगरपालिकेची धडक मोहीम सुरू