मोहा – ज्ञान प्रसारक मंडळ, येरमाळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व प्राचार्य अविनाश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मोहा येथे दि.२९ मे २०२५ वार गुरुवार रोजी शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या अभिवादन कार्यक्रमात विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य अविनाश मोरे यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून गुरुजींना आदरांजली अर्पित केली. यावेळी पर्यवेक्षक डी.बी.मडके, सहशिक्षक सुर्यकांत गुंगे यांच्यासह सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन सुसंगत व प्रेरणादायी वातावरणात पार पडले.शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या कार्याचा आदर्श सर्वांनी आपल्या कार्यातून जपावा,असे आवाहन यावेळी करण्यात आले.
More Stories
महिला सर्वच क्षेत्रात प्रगतीपथावर;उद्योजक होऊ इच्छिणाऱ्या महिलांना मोहेकर मल्टीस्टेटची साथ – हनुमंत मडके
मोहा येथे ‘जागतिक महिला दिना’निमित्त आरोग्य शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रम व महिलांचा सत्कार
ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मोहा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन