धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.27 मे रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 301 कारवाया करुन 2,51,700 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
उमरगा पोलीस ठाणे:आरोपी-नवजोत पुराजी राठोड, रा. पळसगाव तांडा ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.27.05.2025 रोजी07.15 वा. सु.पळसगाव साठवण तलावाचे बाजूस अंदाजे 84,000 ₹ किंमतीचे 1,000 लिटर गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव व 40 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. तर आरोपी-माणिक हामणु चव्हाण, रा. पळसगाव ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.27.05.2025 रोजी 07.50 वा. सु.साठवण तलावाचे बाजूस पळसगाव येथे अंदाजे 57,000 ₹ किंमतीचे 1,200 लिटर गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव व 90 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये उमरगा पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदविले आहेत.
ढोकी पोलीस ठाणे:आरोपी-तोळाबाई बाबासाहेब चव्हाण, वय 38 वर्षे, रा. रा. राजेश्वर पारधीपिडी ढोकी ता. जि. धाराशिव हे दि.27.05.2025 रोजी 17.30 वा. सु.ढोकी ते लातुर रोडच्या उजव्या बाजूस अंदाजे 2,000 ₹ किंमतीची 20 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये ढोकी पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
“ जुगार विरोधी कारवाई.”
ढोकी पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान ढोकी पोलीसांनी दि.27.05.2025 रोजी 15.30 वा. सु. ढोकी पो ठाणे हद्दीत ईट येथील ढोकी पेट्रोल पंप चौक तुळजाभवानी हॉटेलच्या बाजूला ढोकी येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-राजेंद्र दादाराव ढवारे, वय 65 वर्षे, रा. ढोकी ता. जि. धाराशिव हे 15.30 वा. सु. ढोकी पेट्रोपंप चौक तुळजाभवानी हॉटेलच्या बाजूला ढोकी येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 550 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले ढोकी पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12(अ) अन्वये ढोकी पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान उमरगा पोलीसांनी दि.27.05.2025 रोजी 13.20 वा. सु. उमरगा पो ठाणे हद्दीत हैद्राबाद ते सोलापूर जाणारे रोडवर हॉटेल स्वराजचे पाठीमागे मोकळ्या जागेत छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-श्रीकृष्ण उर्फ बंटी प्रभाकर पवार,वय 35 वर्षे, रा. येळी ता. उमरगा जि. धाराशिव,महावीर सोपान सरवसे, वय 45 वर्षे, रमेश राजेंद्र मुगळे, वय 40 वर्षे, सुखवास काशीनाथ भालेकर, वय 40 वर्षे, रा. रामपूर ता. उमरगा जि. धाराशिव हे 13.20 वा. सु. हैद्राबाद ते सोलापूर जाणारे रोडवर हॉटेल स्वराजचे पाठीमागे मोकळ्या जागेत तिरट मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 20,810 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले उमरगा पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12(अ) अन्वये उमरगा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
“ मद्यपी चालकावर गुन्हा दाखल.”
आंबी पोलीस ठाणे:आरोपी नामे-गणेश हणुमंत रणदिवे वय 35 वर्षे, रा. अनाळा ता. परंडा जि. धाराशिव हे दि.27.05.2025 रोजी 18.00 वा. सु.आपल्या ताब्यातील वाहन हे आंबी पोलीस ठाण्याचे परिसरात मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द आंबी पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
“रात्रगस्ती दरम्यान संशईत इसम ताब्यात”
उमरगा पोलीस ठाणे :उमरगा पो.ठा. चे पथक दि. 27.05.2025 रोजी 01.30 वा.सु. उमरगा शहरात रात्रगस्तीस असताना दरम्यान शहरातील जात असताना नगर परिषद उमरग्याचे इमारतीच आडोशाला रोडचे बाजूला उमरगा येथे अंधाराचा दबा धरुन बसलेल्या एका इसमास संशयावरुन पथकाने हाटकले. यावर त्याची विचारपुस केली असता त्याने आपले नाव- सलीम ईक्बाल बागवान, वय 23 वर्षे, रा. मुन्सी प्लॉट उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव असे सांगीतले. पोलीसांनी अशा रात्री अवेळी फिरण्याचे कारण विचारले असता त्याने पोलीसांना उडवाउडवीची उत्तरे दिल्याने तो माला विरूध्द गुन्हा करण्याच्या उद्देशाने तेथे फिरत असल्याचा पोलीसांचा संशय बळावल्याने त्यास ताब्यात घेउन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र पोलिस कायदा कलम- 122 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
“अवैध गांजा सेवन करुन जवळ बाळगुन विक्री करणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
स्थानिक गुन्हेशाखा :आरोपी नामे-फारुख हबीब सय्यद, वय 52 वर्षे, रा. परंडा ता. परंडा जि. धाराशिव, बाबा भिवा शिंदे, वय 65 वर्षे, रा. भोत्रा ता. परंडा जि. धाराशिव,काशिनाथ तुकाराम नरुटे, वय 55 वर्षे, रा. पिंपरीी ता. परंडा, मुस्तफा शुकरखा पठाण, वय 42 वर्षे, रा. सिकंदर गल्ली परंडा, सुधाकर आबासाहेब देशमुख, वय 69 वर्षे, रा. भोत्रा ता. परंडा जमिर गफुर सौदागर, वय 63 वर्षे, रा. परंडा ता. परंडा, युसुफ श्रज्ज्ञक् प्टेल, वय 55 वर्षे, रा. आवटी ता. करमाळा जि. सोलापूर, अनिल प्रतापसिंग परदेशी वय 50 वर्षे, रा. आसु ता. परंडा जि. धाराशिव, नितीन अंबरुषी शिरसकर, वय42 वर्षे, रा. माळी गल्ली परंडा हे दि.27.5.2025 रोजी 13.10 वा. सु. सरकारी दवाखाना परंड्याच्या समोरील एका पत्र्याचे शेडपाठीमागे परंडा येथे 967 ग्रॅम वजनाचे अंदाजे 20,000₹ किंमतीचा लालसर रंगाच्या कॅरीबॅग मध्ये तसेच कागदात गांजाच्या बिया व पाला, ओला व सुक्का अंमली पदार्थाचे चिलीम मध्ये भरुन सेवन करीत असताना व अंमली पदार्थाची विक्री करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळून आले.यावरुन पोलीसांनी अंमली पदार्थ जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे अधिनियम 1985 कलम- 8 (क), 20 (ब)(ii),(a), 27 अन्वये परंडा पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
“ अवैध गुटखा विरोधी कारवाई.”
नळदुर्ग पोलीस ठाणे:आरोपी-तोसिफ रफिक पठाण, वय 21 वर्षे,रा. इटकळ ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि.27.05.2025 रोजी 13.30 वा. सु.इटकळ गावात बसस्थानक जवळ आलीशान हॉटेल मध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत केलेला गुटखा,तंबाखुजन्य पदार्थ,केसर युक्त विमल पानमसाला, डायरेक्टर स्पेशल पान मसाला शॉट999 सुगंधी तंबाखू वि 1 कंपनीचे सुगंधी तंबाखु गुटखा अंदाजे 32,670 ₹ किंमतीचा साठा करुन विक्री करण्याचे उद्देशाने बाळगलेला नळदुर्ग पोलीसांना मिळून आला. यावरुन पोलीसांनी अवैध गुटखा जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द भा.न्या.सं.कलम 274,175,223,123 पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
“रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा नोंद.”
तुळजापूर पोलीस ठाणे : आरोपी नामे-सौदागर बाळासाहेब जगदाळे, वय 33 वर्षे, रा. साळुंकेवाउी ता. अंबाजोगाई जि. बीड हे दि.27.05.2025 रोजी 16.15 वा. सु.आपल्या ताब्यातील मारुती स्वीफट डिझायर कार क्र एमएच 12 के.वाय7967 ही बसस्थानक तुळजापूर येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना तुळजापूर पोलीसांना मिळून आले.यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भा.द.वि. स. कलम 285 अन्वये तुळजापूर पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.
“ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
कळंब पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-दत्तात्रय सुरेशआप्पा लोखंडे, वय 42 वर्षे, रा. मुंडे गल्ली कळंब ता. कळंब जि. धाराशिव यांचे वैभवलक्ष्मी नावाचे किराणा दुकानाचे छताचा पत्रा अज्ञात व्यक्तीने दि.26.05.2025 रोजी रात्री 09.00 ते दि. 27.05.2025 रोजी 09.00 वा. सु. कापून आत प्रवेश करुन दुकानातील रोख रक्कम व किराणा सामना असे एकुण 51,830₹ किंमतीचा माल चोरुन नेला.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-दत्तात्रय लोखंडे यांनी दि.27.05.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 331(4),305(ए) गुन्हा नोंदवला आहे.
“मारहाण.”
मुरुम पोलीस ठाणे :आरोपी नामे-राजाराम खिरु राठोड, नितेश राजाराम राठोड, रोहित राजाराम राठोड, अनुसया राजाराम राठोड रा. आलुर ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि. 20.05.2025 रोजी 22.30 वा. सु.आलुर येथे फिर्यादी नामे- मोहन खिरु राठोड, वय 36 वर्षे, रा. आलुर ता.उमरगा जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी घरातील सामान व अर्थिक व्यवहाराचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉडने मारहाण करुन गंभीर जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-दत्ता खांडेकर यांनी दि.27.05.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 118(2), 115(2), 352, 351(2), 351(3),3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
ढोकी पोलीस ठाणे :आरोपी नामे-हरी शाहु खांडेकर विजयमाला हरी खांडेकर, अंकीता हरी खांडेकर, ओंकार हरी खांडेकर, सर्व रा. येवती ता. जि. धाराशिव यांनी दि. 25.05.2025 रोजी 09.00 वा. सु. येवती येथे फिर्यादी नामे- दत्ता शाहु खांडेकर, वय 50 वर्षे, रा. येवती ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी मागील भांडणाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, कुह्राडीचे दांड्याने मारहाण करुन जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-दत्ता खांडेकर यांनी दि.27.05.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 118(1), 115, 352, 351(2), 351(3),3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“फसवणुक.”
धाराशिव शहर पोलीस ठाणे :आरोपी नामे-असद खान मुस्ताफा खान पठाण, ह.मु. हैद्राबाद राज्य तेलंगणा, रुपेश सावरदेकर, रा. सांगली यांनी दि. 07.01.2025 रोजी दि. 14.03.2025 रोजी पावेतो बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा काळा मारुती जवळ धाराशिव येथे फिर्यादी नामे- सलमान ईक्बाल पठाण, वय 34 वर्षेद्व रा.दर्गाह रोड गाझीपुरा धाराशिव ह.मु. गणेश नगर, नगर परिषद शाळेजवळ धाराशिव हे ह्युमन हेल्थ केअर रिर्सोसेस चॅरिटेबल ट्रस्ट धाराशिव चे उपाध्यक्ष असुन आरोपी असद खान याने ट्रस्टचे उपाध्यक्ष व इतर सदस्य यांचे नावाने बनावट नोटरी बनवून ट्रस्टचे उपाध्यक्ष व इतर पाच सदस्य यांचे बनावट सही व अंगठे नोटरीवर मारुन त्याआधारे बॅक महाराष्ट्र शाखा काळा मारुती जवळ धाराशिव व इंडियन बॅक शाखा बार्शी नाका धाराशिव येथे खाते उघडून त्यामध्ये सांगली येथील आरोपी रुपेश सावरदेकर हा क्रिकेट सट्टा(आयपीएल क्रिकेट मॅच) किंवा ऑन लाईन गेम सट्टा नावाची रक्कम सदर ट्रस्टचे बॅक खाते स्टेट बॅक ऑफ इंडीया, महाराष्ट्र बॅक व इंडियन बॅक शाखा धाराशिव येथील खात्यात एकुण 3,35,98,292₹ रक्कम फिर्यादीची संमती न घेता वापरुन फसवणुक केली.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सलमान पठाण यांनी दि.27.05.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 318(4), 316(5), 338, 336(3), 340(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
आनंदनगर पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-सुभाष देविदास गणेश, वय 74 वर्षे, रा. विकास नगर धाराशिव ता.जि. धाराशिव यांनी दि. 25.05.2025 रोजी 14.00 ते 15.00 वा. सु. बस्थानक धाराशिव येथे अनोळखी दोन इसमांनी फिर्यादीचा विश्वास संपादन करुन आर्थिक फायदा करुन देतो असे सांगून पाच पाच ग्रॅमच्या सोन्याच्या दोन अंगठ्या अंदाजे 40,000₹ रोख रक्कम 20 फिर्यादीची दिशाभुल करुन फसणुक केली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सुभाष गणेश यांनी दि.27.05.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 318(4), 316(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
जनसंपर्क विभाग धाराशिव पोलीस
“सीना कोळेगाव धरणावर आपत्ती व्यवस्थापन पथकाची रंगीत तालीम.”
दि.27.05.2025 रोजी मा.किर्ती किरण पुजार, जिल्हाधिकारी धाराशिव व मा. रितु खोखर पोलीस अधिक्षक धाराशिव यांच्या मार्गदर्शनाखली व उपस्थितीत डोमगाव ता. परंडा येथे सीना कोळेगाव धरण येथे आपत्ती व्यवस्थापन टीमची रंगीत तालीम(मॉक ड्रिल) घेण्यात आली. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मैनक घोष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वैशाली तेलोरे, उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी गौरीप्रसाद हिरेमठ, तहसिलदार निलेश काकडे, तहसिलदार जयवंत काकडे, पोनि दिलीपकुमार परेकर पोलीस ठाणे परंडा, सपोनि गोरक्षनाथ खरड पोलीस ठाणे अंबी, सपोनि प्रविण सिरसट पोलीस ठाण परंडा, जिल्हा संधारण अधिकारी पी के महामुनी, गटविकास अधिकारी राउत, तालुका कृषी अधिकारी नानासाहेब लांडगे, सहा. अभियंता आर बी माने डॉ.साचे यांच्या सह पोलीस विभाग, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
More Stories
उपशिक्षणाधिकारी दत्ताप्रसाद जंगम यांचा राष्ट्रीय ओबीसी अधिकारी महासंघाचे वतीने सत्कार
माजी सैनिक पाल्याकरिता अग्निवीर सैन्य भरतीची संधी
खोट्या निवड याद्यांपासून सावध राहा:आरोग्य विभागाचे आवाहन