धाराशिव – जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,धाराशिवचे पी.एल.व्ही.प्रशांत शशिकांत मते यांची पोलिस अधीक्षक कार्यालय,धाराशिव येथील विक्टिम फ्रेंडली कक्ष व रिसोर्स सेल येथे नियुक्ती करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक कार्यालय, धाराशिव व इंटरनॅशनल जस्टीस मिशन (IJM) यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या विक्टिम फ्रेंडली कक्ष व रिसोर्स सेल या उपक्रमासाठी पी.एल.व्ही. मते यांची निवड करण्यात आली असून,ही नेमणूक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,धाराशिव कार्यालयाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे. या कक्षाच्या माध्यमातून पीडितांना कायदेशीर सेवा, समुपदेशन व सहाय्य मिळवून देणे,तसेच न्यायप्रक्रियेत त्यांना सहकार्य करणे हे उद्दिष्ट असून, या कार्यासाठी मते यांचा अनुभव उपयुक्त ठरणार आहे. ही नियुक्ती पीडितांच्या न्यायाधिकाराच्या दृढ रक्षणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल असून,यामुळे पीडितांना तत्पर व संवेदनशील सहाय्य मिळेल,असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी