August 9, 2025

साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या शिल्पाचे कळंब येथे भव्य अनावरण

  • कळंब – कळंब शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे चौकात त्यांच्याच भव्य शिल्पाचे अनावरण अत्यंत उत्साही व गौरवपूर्ण वातावरणात पार पडले.या ऐतिहासिक क्षणामुळे कळंब शहराच्या सामाजिक व सांस्कृतिक वैभवात मोठी भर पडली असून,नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
    या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार कैलास (दादा) पाटील होते.स्थानिक विकास निधीतून साकारण्यात आलेल्या या शिल्पामुळे त्यांच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक झाले.
    कार्यक्रमाच्या वेळी प्रा.डॉ.संजय कांबळे,युवा नेते शशिकांत (भैया) निरफळ,लहुजी शक्ती सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष रोहित खलचे,विश्वजीत जाधव,जयनंदन हौसलमल आदी मान्यवर उपस्थित होते.
    या प्रसंगी साहित्यरत्न डॉ. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समितीचे अध्यक्ष रोहित (भैया) कसबे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार मानले.त्यांनी आमदार कैलास (दादा) पाटील यांच्या निधीमुळे हे शिल्प साकारता आले,याबद्दल विशेष कृतज्ञता व्यक्त केली.
    “पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर नाही,तर श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे” असा क्रांतिकारी विचार देणारे,आणि आपली ग्रंथसंपदा ही परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखणीस अर्पणारे करणारे थोर साहित्यिक डॉ.अण्णाभाऊ साठे यांचे कार्य समाजातील प्रत्येक घटकासाठी प्रेरणादायी आहे.
    या शिल्पाच्या अनावरणानंतर कळंब शहरात सामाजिक जागृती,सांस्कृतिक उन्नती आणि प्रेरणादायी विचारांची नवी दिशा निर्माण होईल,असा विश्वास या कार्यक्रमात सर्वांनी व्यक्त केला.
error: Content is protected !!