August 9, 2025

अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या शाखेचे उद्घाटन

धाराशिव (जयनारायण दरक) – अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या शाखेचे उद्घाटन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर यांच्या शुभ हस्ते कळंब तालुक्यातील मंगरूळ येथे गुरुवारी ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न झाला.तसेच संघटनेच्या वतीने दिला जाणारा यावर्षीचा “जलपुरुष ” पुरस्कार वाटर फाउंडेशन चे मंगरूळ येथील काकासाहेब भागवत बोंदरे यांना प्रदीप पाटील खंडापूरकर यांना प्रदान करण्यात आला.
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संघटनेचे धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष चक्रधर दिलीपराव रितापुरे, कळंब तालुका अध्यक्ष तानाजी गोपाळराव जाधव, तालुका उपाध्यक्ष अलिफ पठाण, शाखाप्रमुख शिवाजी विनायकराव माने यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या वेळी राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर, प्रदेश संघटक गणीभाई मुलानी , औसा तालुका अध्यक्ष आशिष दिनकरराव सूर्यवंशी व चक्रधर रितापुरे यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजीत झाडके यांनी केले. कार्यक्रमाला मंगरूळ येथील ग्रामस्थांनी उस्फूर्त प्रतिसाद दर्शवला.

error: Content is protected !!