कळंब – बारामती येथे दि.१८ व १९ नोव्हेंबर २०२३ रोजी दोन दिवसीय होणाऱ्या देशस्तरीय सर्वात जास्त पत्रकारांची संख्या असलेल्या व्हाईस ऑफ मीडियाच्या राज्य अधिवेशनासाठी व्हॉईस ऑफ मिडीयाच्या कळंब तालुका कार्यकारिणी,साप्ताहिक विंगच्या तालुका कार्यकारणीच्या पत्रकारांची संख्या असलेली ट्रॅव्हल्स कळंबहुन दि.१६ नोव्हेंबर रोजी रात्री ९.२० मिनिटांनी बारामतीसाठी रवाना झाली. व्हाईस ऑफ मीडियाचे मराठवाडा उपाध्यक्ष अमर चोंदे, शैक्षणिक विभागाचे राज्याचे प्रमुख चेतन कात्रे हे दोन दिवस अगोदरच अधिवेशनाच्या ठिकाणी उपस्थित आहेत. यामध्ये व्हॉईस ऑफ मीडियाचे कळंब तालुकाध्यक्ष रंजीत गवळी ,तालुका उपाध्यक्ष श्रीकांत मडके,तालुका उपाध्यक्ष रामराजे जगताप,कार्याध्यक्ष रामरतन कांबळे,सचिव अमोल मिटकरी,तालुका प्रसिद्धी प्रमुख दिपक माळी,व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंग तालुकाध्यक्ष प्रा.अविनाश घोडके,वरिष्ठ सदस्य माधवसिंग राजपूत, राजाभाऊ बारगुले,सतिश आडसूळ,महेश फाटक,ताजखाँ पठाण, राजु कांबळे,दादा खातीब, अविनाश सावंत,सिकंदर पठाण,रसूल तांबोळी,परमेश्वर खडबडे,अमोल रणदिवे,अजित गायके,अशोक कुलकर्णी,महेश फाटक यांचा समावेश आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात