May 11, 2026

त्यागमूर्ती माता रमाई यांच्या स्मृतिदिनानिमित्त लातूरमध्ये अभिवादन

  • लातूर (साक्षी पावनज्योत वृत्तसेवा) – विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती २०२५ च्या वतीने दि.२७ मे २०२५ रोजी त्यागमूर्ती माता रमाई यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमात डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,लातूर येथे माता रमाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
    या प्रसंगी समितीचे अध्यक्ष सुशीलकुमार महादेव चिकटे, सचिव बाबासाहेब कांबळे, रामभाऊ कोरडे,आकाश सरवदे, अन्य पदाधिकारी,तसेच भारतीय बौद्ध महासभेच्या लातूर जिल्हाध्यक्ष आशाताई सुशीलकुमार चिकटे, राजेंगावकर,कपिल गायकवाड, संजय मस्के,गौतम सोनवणे, लताबाई चिकटे,निलूबाई मस्के यांच्या सह विविध सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी माता रमाई यांच्या त्यागमय जीवनाचे स्मरण करून त्यांच्या कार्याची उजळणी केली.
error: Content is protected !!