June 20, 2025

धाराशिव जिल्हा पोलीसनामा

  • ¨
  • धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.26 मे रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 300 कारवाया करुन 2,62,900 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
  • “ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
  • लोहारा पोलीस ठाणे:आरोपी-बालाजी रुद्र भारती, वय 65 वर्षे, रा.कानेगाव ता.लोहारा जि. धाराशिव हे दि.26.05.2025 रोजी 13.30 वा. सु.आपल्या राहत्या घराचे समोर अंदाजे 1,280 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 16 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. तर आरोपी-रविंद्र शिवाजी चव्हाण, वय 25 वर्षे, रा.सिंदाळवाडी ता. औसा जि. लातुर ह.मु. पेठसांगवी ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.26.05.2025 रोजी 12.45 वा. सु.होळी ते पेठसांगवी जाणारे रोडचे बाजूस होळी पाटी येथे अंदाजे 1,300 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 13 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये लोहारा पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदविले आहेत.
  • शिराढोण पोलीस ठाणे:आरोपी-संतोष रामा नरसिंगे, वय 25 वर्षे, रा. देवळाली ता. कळंब जि. धाराशिव हे दि.26.05.2025 रोजी 15.00 वा. सु.खामसवाडी गोविंदपुर रोडवरील सहारा हॉटेल समोरील मोकळ्या जागेत अंदाजे 1,630 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये शिराढोण पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • मुरुम पोलीस ठाणे:आरोपी-विक्रम लक्ष्मण पवार, वय 32 वर्षे, रा. चौगुले वस्ती तुगाव ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.26.05.2025 रोजी 14.30 वा. सु.चौगुले वस्ती तुगाव येथील तुगाव ते आष्टा कासार जाणारे रोडलगत मोकळ्या जागेत अंदाजे 1,800 ₹ किंमतीची 18 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये मुरुम पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे:आरोपी-विष्णु नारायण राउत, रा. बावी ता. जि. धाराशिव हे दि.26.05.2025 रोजी 18.00 वा. सु.बावी गावचे हद्दीतील धाराशिव ते तुळजापूर जाणारे एनएच52 रोडलगत असणारे रानवारा हॉटेल येथे अंदाजे 1,050 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 30 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • “ जुगार विरोधी कारवाई.”
  • वाशी पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान वाशी पोलीसांनी दि.26.05.2025 रोजी 15.00 वा. सु. वाशी पो ठाणे हद्दीत ईट येथील नागेवाडी ता. भुम चौकात हिरा पकाले यांचे पानटपरी शेजारी पत्राचे शेडमध्ये छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-अशोक बाबुराव शिंदे, वय 27 वर्षे, रा. ईट ता. भुम जि. धाराशिव हे 15.00 वा. सु. ईट येथील नागेवाडी ता. भुम चौकात हिरा पकाले यांचे पानटपरी शेजारी पत्राचे शेडमध्ये कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 550 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले वाशी पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12(अ) अन्वये वाशी पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • “ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
  • उमरगा पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-पांडुरंग यशवंत मोरे, वय 75 वर्षे, रा. तलमोड ता. उमरगा जि. धाराशिव यांचे घराचे व त्यांचे गल्लीतील सोनाबाई मोरे यांचे घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि.25.05.2025 रोजी 22.00 ते दि. 26.05.2025 रोजी 08.00 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन घरातील 39 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकुण 72,000₹ किंमतीचा माल चोरुन नेला.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-पांडुरंग मोरे यांनी दि.26.05.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 331(4),305(अ),62 गुन्हा नोंदवला आहे.
  • धाराशिव शहर पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-मिनाज इसमोद्दीन शेख, वय 42 वर्षे, रा. शम्सपुरा फकीरा नगर ता. जि. धाराशिव यांचे घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि.24.05.2025 रोजी 22.00 ते दि. 25.05.2025 रोजी 08.00 वा. सु. आत प्रवेश करुन घरातील 58 सोन्याचे दागिने व रोख रक्कम 50,000₹ असा एकुण 3,49,000₹ किंमतीचा माल माल चोरुन नेला.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- मिनाज शेख यांनी दि.26.05.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 331(4),305 गुन्हा नोंदवला आहे.
  • उमरगा पोलीस ठाणे : दि- 24.05.2025 रोजी 15.00 वा. सु ते 25.05.2025 रोजी 15.00 वा. सु. 220 केव्ही उपकेंद्र नारंगवाडी येथील तांबेच्या धातुचे आयसोलेटर रॉड132 केव्ही 06 बे चे अर्थ आयसोलेटर रॉड कुण 18 नग, 132 केव्ही टीबीक्स 3 नग असा एकुण 1,42,800₹ किंमतीचा माल अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-राजकुमार पंडीतराव राउत, वय 44 वर्षे, रा. उपकार्यकारी अभियंता 132, के.व्ही. उपकेंद्र उमरगा महापारेषण उमरगा यांनी दि.26.05.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) गुन्हा नोंदवला आहे.
  • भुम पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-जगदिश चंद्रकांत डोंबाळे, वय 25 वर्षे, रा.शिवशंकर नगर भुम ता. भुम जि. धाराशिव यांची अंदाजे 60,000₹ किंमतीची होंडा युनिकॉर्न कंपनीची काळ्या रंगाची मोटरसायकल क्र एमएच 25 एटी 5969 ही दि.23.05.2025 रोजी 21.30 ते दि. 24.05.2025 रोजी 06.00 वा. सु.शिवशंकर नगर भुम येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- जगदिश डोंबाळे यांनी दि.26.05.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) गुन्हा नोंदवला आहे.
  • “मारहाण.”
  • धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे :आरोपी नामे-संजय गोपीनाथ राठोड, रा. जहागीरदारवाडी मधला तांडा ता. जि. धाराशिव यांनी दि. 26.05.2025 रोजी 16.30 वा. सु. जहागीरदारवाडी मधीलाल तांडा येथील जिल्हा परिषद धाळेसमोर फिर्यादी नामे- बाबु सुभाष राठोड, वय 39 वर्षे, रा. जहागीरदारवाडी मधला तांडा ता. जि. धाराशिव यांना व त्यांची पत्नी अनिता यांना नमुद आरोपींनी भावजय व मुलींना शिवीगाळ का केली असे विचारण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉडने मारहाण करुन जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-बाबु राठोड यांनी दि.26.05.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 118(1), 115(2), 352, 351(2), 351(3) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “फसवणुक.”
  • उमरगा पोलीस ठाणे :आरोपी नामे-निखली बाबुराव खाडे, शोभा संजय कोळी, वैशाली साबळे, छाया उर्फ राजनंदिनी अनिल हंकारे सर्व रा. घालवाड ता. शिरोळ जि. कोल्हापूर यांनी दि. 09.01.2024 रोजी दि. 28.12.2024 रोजी पावेतो वेगवेगळ्या ठिकाणी फोन पे व गुगल पेवरुन फिर्यादी नामे- सुजाता मोहन घोडके, वय 35 वर्षे, रा. शिंदे गल्ली उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव यांना व त्यांची मैत्रिणीला मी पोलीस आहे मी पीएसआय परीक्षा देतो तसेच मुंबई मेट्रोमध्ये बिपीन सिंग नावाचे अधिकारी व माझे पोलीस अधिकारीच्या पण ओळखी आहेत तुम्हाला नोकरी लावतो असे अमिष दाखवून फिर्यादी यांचे बॅक खात्यावरुन 15,10,811₹ काढून घेवून फसवणुक केली आहे. नमुद आरोपींनी तुझेमुळे आमचा मानेलेला भाउ निखील बाबुराव खाडे याची नोकरी गेली आहे. त्याला तु जिम्मेदार आहेस तुला आम्ही सोडणार नाही बघुन घेवू असे म्हणून शिवीगाळ करुन जिवे ठारमारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सुजाता घोडके यांनी दि.26.05.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 318(4), 352, 351(2), 351(3),351(4),3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “लैंगीक अत्याचार.”
  • धाराशिव शहर पोलीस ठाणे :एका गावातील 35 वर्षीय महिला (नाव- गावगोपनीय) दि.25.05.2025 रोजी12.00 वा. सु. ते 19.30 वा. सु. ही घरी एकटी असताना गावातील एका तरुणाने तिस फोन करुन मला तुला भेटायचे आहे तु जर मला भेटली नाही तर मी फाशी घेईन असे म्हणून बोलावून घेवून तिच्यावर लैंगीक अत्याचार करुन इतर नमुद आरोपींनी तिस जातीवाचक शिवीगाळ करुन दांड्याने मारहाण केली. अशा मजकुराच्या पिडीतेने दि.26.05.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं.कलम-64(1), 126(2),118(1), 352, 351(2),3(5) सह अ.जा.ज.प्र.का. कलम 3(1)(ई),(आर)(एस)(डब्ल्यु(i)(i) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • जनसंपर्क विभाग धाराशिव पोलीस
error: Content is protected !!