कळंब – दिल्ली येथे दि.१९ मे २०२५ रोजी पार पडलेल्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेत,कळंब येथील संकल्प व्हॉलीबॉल क्लबच्या मुलींनी उल्लेखनीय यश संपादन करत द्वितीय क्रमांक पटकावला व सिल्वर मेडल आपल्या नावे केले. या संघाने याआधी स्टेयर्स फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदक जिंकले होते.त्यामुळे त्यांची दिल्लीतील राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. ग्रामीण भागातून आलेल्या या मुलींनी कठोर सराव,चिकाटी आणि समर्पणाच्या जोरावर दिल्लीसारख्या मोठ्या व्यासपीठावर आपली चमकदार कामगिरी सादर केली.संघातील सर्व खेळाडू संकल्प व्हॉलीबॉल क्लबच्या आहेत,आणि प्रशिक्षक रतन काका उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी रोजचा कठोर सराव केला.त्यांच्या या मेहनतीचे आज फळ मिळाले असून संपूर्ण जिल्ह्यात त्यांचे कौतुक होत आहे. संघातील खेळाडू – तन्वी टोपे, स्नेहा थोरबोले,साक्षी काळे,सृष्टी टोपे,सायली शिंदे,माहेश्वरी जमादार धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संकल्प व्हॉलीबॉल क्लबला दिलेली आर्थिक मदत फलदायी ठरल्याचे सर्वत्र बोलले जात आहे. प्रशिक्षक रतन काका उबाळे यांनी पालकमंत्री सरनाईक, देवकते,नितीन लांडगे,आणि चेतन कात्रे यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.तर वैशाली आनंद टोपे,ज्योती समाधान शिंदे,रेखा यशवंत टोपे, ज्योती नवनाथ थोरबोले,राणी रामानंद जमादार,विद्या सचिन काळे,बोंदर मॅडम,चव्हाण मॅडम (पोलिस स्टेशन कळंब) डॉ.अभिजीत लोंढे,यशवंत दशरथ,डॉ.राजे चव्हाण,लक्ष्मण मोहिते,दत्ता कवडे,जगदीश गवळी,सागर भडंगे,गणेश डोंगरे, सागर काकडे,रवी उबाळे पत्रकार ज्ञानेश्वर पतंगे,शितल कुमार धोंगडे,बाळू बाळापुरे, माधव सेहराजपुर,नारायण बागले,विशाल वाघमारे,संघरत्न कसबे,विश्वजीत वेदपाठक आदींसह सर्व क्षेत्रातून संकल्प व्हॉलीबॉल क्लबच्या या घवघवीत यशाचे अभिनंदन होत आहे.या यशस्वी संघाला आगामी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात