मोहा – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने कळंब तालुक्यातील मोहा येथील ज्ञान प्रसार उच्च माध्यमिक विद्यालयातील बारावीच्या परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले.यामध्ये विज्ञान शाखेतून प्रथम कु.जावरकर प्रियंका मोतीलाल(73.33%) द्वितीय धुर्वे सानिया तुकाराम (72.83%),तर तृतीय वाघ मुक्ता अशोक (72%) तर कला शाखेतून प्रथम तांबारे गौरी सतीश (74.17%), द्वितीय कु. सांगळे रागिनी धोंडीराम (69%) तर तृतीय महाजन अश्विनी अंबऋषी (60%) तसेच वाणिज्य विभागातून प्रथम कु.मुंडे कशिश राजेखान (85.33%),द्वितीय कु. खडबडे ज्योती राजेंद्र (79.67%) तर तृतीय कु. गव्हाणे नेहा अनंत (75.50%) या विद्यार्थीनींचा मुख्याध्यापक तथा प्राचार्य अविनाश मोरे, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी रमेशभाऊ मोहेकर,उच्च माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक प्रा.सुनील साबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.त्यांचाही सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रीडा शिक्षक संजय मडके,प्रा.नवनाथ करंजकर,प्रा.विठ्ठल जाधव, प्रा.अमित जाधव,प्रा.राहुल भिसे, प्रा.रोहित मोहेकर,प्रा.दिग्विजय पाटील,प्रा.देवदत्त पाटील, प्रा.प्रतिभा सावंत,अमितकुमार शर्मा,अंगद आगलावे,ज्ञानोबा टोपे तसेच विष्णू जाधव यांनी परिश्रम घेतले.
More Stories
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना भावपूर्ण अभिवादन
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना ज्ञान प्रसार विद्यालयात भावपूर्ण अभिवादन
ज्ञान प्रसार प्राथमिक विद्यालय मोहा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन