मोहा – ज्ञान प्रसारक मंडळ, येरमाळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने तालुक्यातील मोहा येथील प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात 1 मे 2025 रोजी नवनियुक्त मुख्याध्यापक तथा प्राचार्य अविनाश मोरे यांचा स्वागत समारंभ पार पडला. याप्रसंगी संस्थेचे ज्येष्ठ संचालक तात्यासाहेब पाटील,संस्थेचे प्रशासकीय अधिकारी रमेश भाऊ मोहेकर,नुकतेच सेवानिवृत्त झालेले मुख्याध्यापक तथा प्राचार्य संजय जगताप,पर्यवेक्षक डी.बी.मडके तसेच उच्च माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक प्रा.सुनील साबळे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी प्राचार्य संजय जगताप यांनी मनोगत व्यक्त केले तर मुख्याध्यापक अविनाश मोरे यांनी उपस्थितांशी संवाद साधला.कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप रमेश भाऊ मोहेकर यांच्या भाषणाने झाला. सुत्रसंचालन शेखर गिरी यांनी केले तर आभार प्रदर्शन सहशिक्षक सूर्यकांत गुंगे यांनी केले.कार्यक्रमाला सर्व शिक्षक, शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
More Stories
महिला सर्वच क्षेत्रात प्रगतीपथावर;उद्योजक होऊ इच्छिणाऱ्या महिलांना मोहेकर मल्टीस्टेटची साथ – हनुमंत मडके
मोहा येथे ‘जागतिक महिला दिना’निमित्त आरोग्य शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रम व महिलांचा सत्कार
ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मोहा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन