August 9, 2025

ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय – विलास पाटील

  • कळंब- सध्या भाजप – शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरकार हे ग्रामीण भागातील जनतेसाठी विविध योजना राबवून ग्रामीण भागातील जनतेचे जिवनमान उंचावण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार,रोहयो मंत्री संदिपान भुमरे, पालकमंत्री तानाजी सावंत,दुव्यांग कल्याण मंत्री बच्चू कडू,आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव – कळंब विधानसभा मतदारसंघात विविध विकासकामे खेचून आणत आहे.भविष्यात मला या मतदारसंघातील बेरोजगार युवकांसाठी काम करायचे असल्याचे बाजार समितीचे संचालक विलास पाटील यांनी सांगितले.
    ते तालुक्यातील आथर्डी येथील नुतन ग्रामपंचायत कार्यालयाच्या उद्घाटन व मंत्री संदिपान भुमरे मार्ग सिमेंट रस्त्याचे लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अरूण चौधरी,सरपंच रतन अशोक सुबरे,उपसरपंच शरद चौधरी,मनोज चौधरी,रामराज धुमाळ आबा चौधरी,जगन्नाथ धुमाळ आदि उपस्थित होते.
    पुढे बोलताना पाटील म्हणाले की,सध्याच्या सरकारने धाराशिव – कळंब विधानसभा मतदारसंघात भरघोस निधी दिला असुन गावा अंतर्गत रस्ते व शेतातील रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर कामे होत असुन माझ्या शेतकरी बांधवाना आता शेती कसणयासाठी अडचण निर्माण होणार नाही.आता आपल्या भागातील युवकांचे रोजगारासाठीचे स्थलांतर हा मोठा प्रश्न आहे. यासाठी आम्ही पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच मास्टर प्लॅन तयार करणार असुन त्याची अमलबजावणी सुद्धा करुन स्थलांतर थांबवू असे आश्वासन दिले.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार उपसरपंच शरद चौधरी यांनी केले.तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमोल साखरे,अशोक घुले, बालाजी शेळके.आर.के. कोल्हे,नारायण टेकाळे, तेजस साखरे,गोविंद चौधरी,वैजिनाथ झटाळ, रवींद्र चौधरी,विनोद चौधरी,महेश खराडे,राम साखरे आदिंनी प्रयत्न केले.
error: Content is protected !!