May 6, 2025

Home »ई-पेपर पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू

पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू

  • अर्ज करण्याची अंतिम तारीख १ जून २०२५
  • धाराशिव (जिमाका) – ग्रामीण भागातील पशुपालक,शेतकरी बांधव व सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी पशुसंवर्धन विभागामार्फत विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख १ जून २०२५ असून,या योजनांचा उद्देश ग्रामीण जनतेस स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देणे हा आहे.प्रमुख योजना ह्या पुढीलप्रमाणे आहे.दुधाळ गाई/म्हशींचे गट वाटप,शेळी-मेंढी गट वाटप,१००० मांसल कुक्कुट पक्षी संगोपनासाठी निवारा शेडसाठी अर्थसहाय्य,१०० कुक्कुट पिलांचे वाटप,२५ अधिक ३ तलंगाचा गट वाटप करण्यात येणार आहे.
    योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक लाभार्थ्यांनी https://ah.mahabms.com या संकेतस्थळावर किंवा AH-MAHABMS या मोबाइल अ‍ॅपद्वारे (Google Play Store वर उपलब्ध) ऑनलाईन अर्ज भरावा. अर्ज भरण्याची प्रक्रिया अगदी सुलभ असून, कमीत कमी माहिती टाईप करावी लागते.अर्ज कालावधी हा ०२ मे २०२५ ते ०१ जून २०२५ असा आहे.
    महत्त्वाची वैशिष्ट्ये व फायदे:
    एकदा अर्ज केल्यानंतर पुढील ५ वर्षांसाठी प्रतिक्षायादीत समावेश राहील.लाभार्थ्यांना अर्जाच्या स्थितीबाबत SMS द्वारे माहिती देण्यात येईल. मागील वर्षी अर्ज केलेल्यांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही.मोबाईलवरून अर्ज करता येण्याची सुविधा आहे.
    प्रक्रियेचे वेळापत्रक : कालावधी व प्रक्रिया पुढीलप्रमाणे राहील.
    ३ मे – ०२ जून – ऑनलाईन अर्ज स्वीकारणे,०३ – ०७ जून – रॅन्डमायझेशनद्वारे प्राथमिक निवड, ०८ – १५ जून – कागदपत्र अपलोड
    १६ – २४ जून – कागदपत्र पडताळणी,२५ – २७ जून -त्रुटी सुधारणा,२८ – ३० जून – अंतिम पडताळणी,०२ जुलै -अंतिम पात्र यादी प्रसिद्ध करण्यात येईल.
    टोल फ्री क्रमांक: १९६२ (सोमवार ते शनिवार, सकाळी ७ ते सायंकाळी ६)
    अधिक माहितीसाठी: नजीकचा पशुवैद्यकीय दवाखाना / पंचायत समिती / जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय येथे संपर्क साधावा.तरी सर्व पात्र नागरिकांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी वेळेत ऑनलाईन अर्ज करावा,असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.
error: Content is protected !!