February 9, 2026

२१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होणार

  • ‘योगसंगम’ पोर्टलवर नोंदणीचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
  • धाराशिव (जिमाका)- आंतरराष्ट्रीय योग दिन यंदा २१ जून रोजी जिल्ह्यात उत्साहात आणि व्यापक सहभागासह साजरा करण्यात येणार असून,या पार्श्वभूमीवर ‘योगसंगम’ पोर्टलवर कार्यक्रम नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार यांनी केले आहे.
    जिल्हाधिकारी कार्यालयात १९ जून रोजी आयोजित बैठकीत पूजार यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की,योग हा भारताच्या प्राचीन आणि समृद्ध परंपरेचा अनमोल वारसा असून,तो शारीरिक,मानसिक आणि आत्मिक आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक आहे.योगामुळे तणाव नियंत्रण,आरोग्यदायी जीवनशैली आणि एकाग्रता यांचा विकास साधता येतो.
    जिल्हा प्रशासनामार्फत नागरिकांमध्ये योगाबाबत जनजागृती वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.यामध्ये शाळा,महाविद्यालये,योग संस्था, स्थानिक मंडळे आणि सामाजिक संस्था यांनी सक्रीय सहभाग नोंदवावा.त्यासाठी त्यांनी http://yoga.ayush.gov.in/yoga-sangam या केंद्र शासनाच्या पोर्टलवर आपले योग दिन कार्यक्रम नोंदवून त्यांचे फोटोही अपलोड करावेत.
    या माध्यमातून देशभरातील योग कार्यक्रमांचे केंद्रीकरण होईल आणि नागरिकांना त्यांच्या परिसरातील उपक्रमांची माहिती सहज मिळू शकेल.योग दिन अधिक प्रभावी आणि सर्वसमावेशक करण्यासाठी सर्वांनी सहभाग द्यावा,असे आवाहन पूजार यांनी केले आहे.
error: Content is protected !!