धाराशिव (जिमाका)- सार्वजनिक वितरण प्रणालीतील सर्व रेशनकार्डधारकांची ई-केवायसी प्रक्रिया राज्य शासनाच्या निर्देशानुसार सध्या सुरू असून,केंद्र शासनाच्या २ मे २०२५ रोजीच्या पत्रानुसार ही प्रक्रिया ३० जून २०२५ पर्यंत पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. या तारखेनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही.तसेच,ज्या कार्डधारकांची ई-केवायसी पूर्ण झालेली नसेल,अशा कार्डधारकांना जुलै २०२५ पासून अन्नधान्याचे वितरण करण्यात येणार नाही,याची नोंद घ्यावी.ई-केवायसी करण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत:जवळच्या रेशन दुकानात जाऊन मोबाईल अॅपच्या माध्यमातून स्वतःऑनलाईन प्रक्रिया करता येईल. या प्रक्रियेसाठी केंद्र शासनाने “Mera e-KYC Mobile App” आणि “Aadhar Face RD Service App” सुरू केली आहेत.या अॅप्सचा वापर करण्याची पद्धत पुढीलप्रमाणे आहे. गुगल प्ले स्टोअरवरून दोन्ही अॅप्स डाऊनलोड करून इन्स्टॉल करा. “Mera e-KYC” अॅप उघडा,राज्य व ठिकाण निवडा.आधार क्रमांक टाका व आलेला OTP भरून सबमिट करा.माहिती पडताळा करून ‘Submit’ करा.नंतर ‘Face E-KYC’ वर क्लिक करून डोळे हलवत सेल्फी द्या. प्रक्रिया यशस्वी झाली की, ‘E-KYC पूर्ण’ असा संदेश दिसेल. तरी सर्व रेशनकार्डधारकांनी ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी व शेवटच्या तारखेची वाट न पाहता आपल्या कुटुंबाच्या अन्नसुरक्षेसाठी तत्काळ पावले उचलावीत,असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती स्वाती शेंडे यांनी केले आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला