कळंब – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संचलित शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दिनांक 21-09-2023 वार गुरुवार रोजी सकाळी 11 वाजता मेरी माटी मेरा देश या अभियानांतर्गत अमृत कलशची पूजा ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संस्थेचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या हस्ते करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बात या रेडिओ कार्यक्रमातून यावर्षी एक नवीन नारा दिला आहे. तो म्हणजे वीर शहिदांना सन्मान देण्यासाठी मेरी माटी, मेरा देश ,अभियान चालवले जाणार आहे. या अभियानांतर्गत आपल्या देशासाठी बलिदान दिलेल्या शहिदांच्या स्मृती प्रित्यर्थ अनेक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.त्याचाच एक भाग म्हणून महाविद्यालयात अमृत कलशची स्थापना करण्यात आली.तसेच पुढे महाविद्यालयात विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत .यावेळी प्रोफेसर ज्ञानेश चिंते, डॉ.दिपक सूर्यवंशी,डॉ.नागनाथ अदाटे, डॉ. राघवेंद्र ताटीपामुल,डॉ. दत्ता साकोळे, डॉ.संजय सावंत,प्रा.नितीन अंकुशराव, प्रा.बालाजी राऊत,प्रा.गणेश आडे, प्रा. वसंत मडके, प्रा.प्रताप शिंदे, प्रा.काझी,डॉ.रुपेश मानेकर,डॉ.श्रीकांत भोसले,हनुमंत जाधव,अरविंद शिंदे, व प्रा. बालाजी बाबर, प्रा. सुशील जमाले,प्रा.अमोल शिंदे, प्रा.शाहरुख शेख, प्रा. मारुती शिंपले,प्रा. राम दळवी कालिदास सावंत राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या कार्यक्रमाधिकारी डॉ. मीनाक्षी जाधव व डॉ संदीप महाजन ,डॉ. नामानंद साठे तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
More Stories
धाराशिव जिल्हा पोलीसनामा
“सा.साक्षी पावनज्योत” विशेषांकाचे दिमाखदार प्रकाशन!
विद्याभवन हायस्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश