केज – महाराष्ट्र शासनाच्या सुरू असलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत सुरू असलेल्या बस सेवेचा विद्यार्थ्यांना लाभ घेता येत नाही सदर योजना मुलींसाठी खास सुरू करण्यात आलेली असून त्याचा सदर गावांमधील विद्यार्थी यांना लाभ व्हावा, विद्यार्थ्यांना शाळेत येणे जाण्याची अडचण पाहता त्यांचे खूप मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे तरी त्यांना बस सेवा सुरू करून देऊन उपकृत करावे व ज्येष्ठ नागरिक वृद्ध नागरिक यांना दवाखान्यासाठी, बाजारासाठी येथे दळणवळणासाठी आपणधारूर केज साळेगाव मार्गे सातेफळ अशी केज ते डोका मार्गे बस सेवा सुरू करण्यात यावी व सकाळी १० व संध्याकाळी ४ वाजता असा वेळ ठरवून देण्यात यावा. अशा मागणीचे निवेदन वंचित बहूजन आघाडीच्या वतीने धारूरचे आगार व्यवस्थापक यांना देण्यात आले आहे. बस सुरू न झाल्यास आपल्या कचेरीसमोर सम्यक विद्यार्थी आंदोलन वंचित बहुजन आघाडी बीड जिल्ह्याच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल व शिवाय विद्यार्थी यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची आपलीच जबाबदारी राहील असा धारुर डेपोला इशारा वंचीत बहुजन युवा आघाडीचे नेते लक्ष्मणराव ओव्हाळ व सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे सदस्य कुमार शंकरराव बचुटे यांनी सदर निवेदनाद्वारे दिला. यावेळी वंचितचे कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले